लग्नाला प्रतिसाद देत नसल्याने अल्पवयीन मुलीवर युवकाचा धारदार शस्त्राने हल्ला!
पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात एका युवकाने १७ वर्षीय युवतीच्या गळ्यावर कटरने वार करून खुनी हल्ला केला आहे. हल्ला करून पळून जात असताना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करून युवकाला ताब्यात घेतले आहे. मुलीच्या घरचे लग्नाला परवानगी देत नसल्याने दोघांमध्ये झालेल्या वादातून तरुणाने हे पाऊल उचलेले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभ पोलीस चौकीच्या […]
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात एका युवकाने १७ वर्षीय युवतीच्या गळ्यावर कटरने वार करून खुनी हल्ला केला आहे. हल्ला करून पळून जात असताना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करून युवकाला ताब्यात घेतले आहे. मुलीच्या घरचे लग्नाला परवानगी देत नसल्याने दोघांमध्ये झालेल्या वादातून तरुणाने हे पाऊल उचलेले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
ADVERTISEMENT
दौंड तालुक्यातील कुरकुंभ पोलीस चौकीच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राहुल श्रीशैल निरजे (वय २७, राहणार खटाव जिल्हा सांगली सध्या रा. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, राहुल निरजे हा संबंधित युवतीवर प्रेम करत होता. या युवतीशी लग्न व्हावे यासाठी तो प्रयत्नशील होता. मात्र संबंधित युवतीकडून प्रतिसाद मिळत नव्हता.
आज सकाळी दोघेही दुचाकीवरून पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गावर मळद तलावाच्या समोरील शेतात आले होते. स्थानिक लोकांनी त्यांना शेताकडे जाताना पाहिले मात्र काही वेळातच हा तरुण पळत जाताना दिसला. त्याने या युवतीला गाठून तिचा गळा चिरत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हे वाचलं का?
या घटनेत ही युवती गंभीर स्वरूपात जखमी झाली आहे. तिला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राहुल निरजे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, दौंड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT