प्रियकराच्या मदतीने तरुणीचा होणाऱ्या नवऱ्यावर विषप्रयोग, घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

यवतमाळ: लग्नाला (Marriage) अवघे चार दिवस उरले असताना होणाऱ्या नवऱ्याला (Future Husband) प्रियकराच्या (Boyfriend) मदतीने शीतपेयातून (Cold drink) विष (poisoned) पाजून जीवे मारण्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे घडला आहे. या संपूर्ण घटनेची कबुली खुद्द भावी पत्नीनेच पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

तसंच ही घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली असून त्या आधारे पोलीस अधिक तपास देखील करत आहेत. एखाद्या सिनेमातीव घटनेप्रमाणे घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाची संपूर्ण तालुक्यात चर्चा रंगली आहे.

नेर तालुक्यातील कोहळा येथील किशोर परशराम राठोड या तरुणाचा विवाह बाभूळगाव तालुक्यातील जांभुळणी येथील एका तरुणीशी ठरलं होतं.19 एप्रिलला या दोघांचाही विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र तरुणीचे सोनखास येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तरुणीला त्याच्या सोबतच संसार करायचा होता. मात्र कुटुंबाच्या शब्दाबाहेर जाता येत नाही म्हणून तिने कोहळ्याच्या किशोर सोबतच्या लग्नाला नकार दिला नाही. परंतु यातून मार्ग काढून लग्न तुटले पाहिजे यासाठी तिने एक जीवघेणी शक्कल लढवली.

हे वाचलं का?

अनैतिक संबंध… प्रेयसीची हत्या आणि मास्टरमाईंड प्रियकर, पुण्यातील नेमकं प्रकरण आहे तरी काय?

संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर यांनी लग्न मोडावं म्हणून एक कट रचला. काही वस्तू खरेदी करण्याचा उद्देशाने होणाऱ्या नवऱ्याला नेर येथे बोलावण्यात आले. तेव्हा तरुणी देखील आपल्या दोन भाऊ व बहिणींसोबत नेरमध्ये दाखल झाली. त्यानंतर होणाऱ्या नवऱ्याला सोबत घेऊन एका ज्यूस सेंटरमध्ये ती गेली. ठरल्याप्रमाणे त्याला शीतपेय पिण्याचा आग्रह तिने धरला. होणाऱ्या बायकोच्या आग्रहाखातर तरुणाने देखील शीतपेय घेतलं. त्यानंतर तरुणी आपल्या बहीण भावसह निघून गेली. काही वेळात तरुण सुद्धा तिथून निघून गेला.

ADVERTISEMENT

मात्र, थोड्याच वेळात त्याला मळमळ सुरु झाली आणि तो अचानक खाली कोसळला. त्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल 13 दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले. किशोर पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर उघड केला. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत तरुणीला आणि तिच्या दोन भावांना ताब्यात घेतले. तेव्हा या शीतपेयातून आपणच विष प्रयोग केल्याची कबुली तरुणीने दिली. त्या नंतर संबंधित तरुणीसह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

प्रेयसीला पेटवणाऱ्या प्रियकराचाच मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

ज्या ज्यूस सेंटरमध्ये तरुणीने शीतपेयातून होणाऱ्या नवऱ्यावर विष प्रयोग केला त्या ठिकाणाचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले असून तरुणी सोबत एक मुलगी आणि दोन तरुण किशोर सोबत ज्यूस पिताना दिसत आहेत.

तरुणीला प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करायचे होते आणि त्यासाठीच तिने हा विचित्र प्रकार केल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने या विष प्रयोगातून किशोरचा जीव वाचला. पण तरुणीने प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी जो कट रचला त्यामुळे तिच्या आई-वडिलांना समाजात मान खाली घालण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. (young woman poisoned her future husband with the help of boyfriend incident captured on cctv)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT