बीडमध्ये चाललंय काय?; हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवाने केला हवेत गोळीबार
–रोहिदास हातागळे, बीड बीडचा बिहार झालाय, असा सूर लावत बीड जिल्ह्यातील आमदारांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून सरकारला लक्ष्य केलं होतं. यावरून मुंडे बहीण-भावामध्ये शाब्दिक वार झाल्याचं बघायला मिळालं. मात्र, बीड चाललंय काय असा प्रश्न पडावा अशाच घटना घडताना दिसत असून, आता चक्क लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवाने हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. […]
ADVERTISEMENT
–रोहिदास हातागळे, बीड
बीडचा बिहार झालाय, असा सूर लावत बीड जिल्ह्यातील आमदारांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून सरकारला लक्ष्य केलं होतं. यावरून मुंडे बहीण-भावामध्ये शाब्दिक वार झाल्याचं बघायला मिळालं. मात्र, बीड चाललंय काय असा प्रश्न पडावा अशाच घटना घडताना दिसत असून, आता चक्क लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवाने हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात अंबाजोगाई पोलिसांनी नवरदेवासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
लग्न हा मंगल प्रसंग, पण एखादी चूक या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावू शकते. अंबाजोगाईतही असंच घडलं. आनंदाच्या वातावरण हळदी समारंभ सुरू असताना नवरदेव व मित्राने डाँल्बीच्या तालावर ठेका धरला. इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी पिस्तुलाने हवेत गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाला आणि नवरदेवावरसह चार मित्रांवर गुन्हा दाखल झाला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सुसंस्कृत, शिक्षणाची पंढरी आणि आध्यात्मिक शहर ओळख असलेल्या अंबाजोगाईत ही घटना घडली. शनिवारी रात्री बीड रोडवरील एका मंगल कार्यालयात हळदी समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सांऊड सिस्टीमवर गाणे लावून नवरदेव, नातेवाईक, मित्रपरिवार आनंदाने गाण्याच्या तालावर धूंद होऊन नाचत होते.
काही मित्रांनी नवरदेवाला खांद्यावर उचलून घेतलं आणि गाण्याच्या तालावर ठेका धरला. नृत्य करत असताना नवरदेव व मित्राने हातात पिस्तुल घेत हवेत गोळीबार केला. हळदीच्या कार्यक्रमातील गोळीबाराचा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियातून प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओची चर्चा सुरू झाल्यानंतर ‘या घटनेची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिले होते.
ADVERTISEMENT
याप्रकरणी अखेर नवरदेवासह त्यांच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हळदीच्या कार्यक्रमात इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने अवैधरित्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसांनी बालाजी भास्कर चाटे (रा. साकुड, ता. अंबाजोगाई), शेख बाबा (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) आणि इतर दोन ते तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT