शिवसेनेनंतर आता युवा सेनेलाही ठाण्यात खिंडार; पूर्वेश सरनाईकांकडून आदित्य ठाकरेंना झटका
आमदारांचा एक मोठा गटा पक्षातून बाहेर पडल्यानं शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. आमदारांपाठोपाठ ठाण्यासह काही महापालिका आणि नगरपालिकांचे माजी नगरसेवकही शिंदे गटात सामील झाले असून, आता याचीच पुनरावृत्ती युवा सेनेत सुरू झाली आहे. युवा सेनेला ठाण्यात पहिलं खिंडार पडलं आहे. युवा सेनेचे सचिव आणि माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT

आमदारांचा एक मोठा गटा पक्षातून बाहेर पडल्यानं शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. आमदारांपाठोपाठ ठाण्यासह काही महापालिका आणि नगरपालिकांचे माजी नगरसेवकही शिंदे गटात सामील झाले असून, आता याचीच पुनरावृत्ती युवा सेनेत सुरू झाली आहे. युवा सेनेला ठाण्यात पहिलं खिंडार पडलं आहे. युवा सेनेचे सचिव आणि माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.
ठाणे जिल्ह्यातील युवा सेनेत कार्यरत असलेल्या तरुण आणि तरुणींनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. युवा सेना सचिव आणि माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्यासोबत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे झालेल्या कार्यक्रमात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला.
शिंदे सरकारचं भविष्य काय?; सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर २० जुलैला सुनावणी
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेत वेगळी राजकीय वाट निवडली. भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी राज्यात सत्ता स्थापन केली असून, आता एकनाथ शिंदे यांना विविध भागातील पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.