अमरावतीतल्या कोरोना रूग्णवाढीमागे विमा कंपन्या-दवाखान्यांचं रॅकेट?
अमरावतीतल्या वाढत्या रूग्णसंख्येमागं इन्शुरन्स कंपन्या आणि खासगी दवाखाने यांची मिलिभगत कारणीभूत असल्याचा खळबळजनक आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केलाय. कोरोनाच्या या वाढत्या संख्येनं अमरावतीची बदनामी होत असल्याचा दावाही साबळेंनी मुंबई तकशी बोलताना केला. वाढत्या रूग्णसंख्येमुळे संपूर्ण देशाचं लक्ष अमरावतीतकडे वेधलं गेलंय. अमरावतीत कोरोनाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव का झाला, याचं शोध प्रशासनाकडून घेतला […]
ADVERTISEMENT

अमरावतीतल्या वाढत्या रूग्णसंख्येमागं इन्शुरन्स कंपन्या आणि खासगी दवाखाने यांची मिलिभगत कारणीभूत असल्याचा खळबळजनक आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केलाय. कोरोनाच्या या वाढत्या संख्येनं अमरावतीची बदनामी होत असल्याचा दावाही साबळेंनी मुंबई तकशी बोलताना केला.
वाढत्या रूग्णसंख्येमुळे संपूर्ण देशाचं लक्ष अमरावतीतकडे वेधलं गेलंय. अमरावतीत कोरोनाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव का झाला, याचं शोध प्रशासनाकडून घेतला जातोय. अशात जिल्हा परिषद सदस्यानेच खळबळजनक आरोप केल्यानं प्रकरणाला नवंच वळण मिळालंय. प्रकाश साबळे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही रूग्णसंख्या वाढीचा मुद्दा मांडला.
मुंबई तकशी बोलताना प्रकाश साबळे म्हणाले, प्रायव्हेट लॅबधारक इन्शुरन्सच्या फायद्यासाठी कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट देत आहेत. त्यामुळे नाहक अमरावतीची संपूर्ण राज्यात आणि देशात बदनाम होतेय. आणि निष्कारण लॉकडाउन लावून सर्वसामान्यांसह गरीब हातावर असणाऱ्या लोकांना याचा त्रास होतोय.
प्रकाश साबळे यांनी या प्रकरणी ज्यांचे आरटीपीसीआर चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत त्यांची अँटीबॉडी टेस्ट करावी. आणि अँटीबॉडी टेस्ट निगेटिव्ह आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.