‘संजय राऊतांनी भाजपसमोर गुडघे टेकले नाही, ते काय माफी मागतील’, कोण म्हणालं?

मुस्तफा शेख

Sunil Raut on Sanjay Raut: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. याच प्रकरणी विधानसभेत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग (privilege motion) दाखल करण्यात आला आहे. ज्यासाठी हक्कभंग समितीही गठीत करण्यात आली आहे. राऊतांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष हे संजय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sunil Raut on Sanjay Raut: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. याच प्रकरणी विधानसभेत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग (privilege motion) दाखल करण्यात आला आहे. ज्यासाठी हक्कभंग समितीही गठीत करण्यात आली आहे. राऊतांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष हे संजय राऊतांविरोधात आक्रमक असताना दुसरीकडे संजय राऊतांचे भाऊ आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनीही सत्ताधाऱ्यांच्या या कारवाईला संजय राऊत तयार असल्याचं म्हटलं आहे. (sunil raut said sanjay raut did not kneel before bjp now what will he apologize for)

संजय राऊतांनी काहीही चुकीचं वक्तव्य केलेलं नसल्याचं सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत हे माफी मागणार नाहीत. ते भाजपसमोर झुकले नाहीत… तुरुंगात जायला घाबरले नाहीत, ते हक्कभंगाला काय घाबरणार? असं म्हणत सुनील राऊत यांनी हक्कभंगाच्या कारवाईबाबत निषेध व्यक्त केला आहे.

Sanjay राऊतांवर हक्कभंग, पण विधिमंडळाला खासदारावर कारवाई करता येते का?

‘संजय राऊतांनी भाजपसमोर गुडघे टेकले नाही, ते…’

‘संजय राऊत हे हक्कभंगाला घाबरत नाही. संजय राऊत ही घाबरणारी व्यक्ती नाही… संजय राऊतांवर जी कारवाई करतायेत ती चुकीची आहे. जे विधान संजय राऊतांनी विधानभवनच्या बाहेर म्हटलं आहे. हे विधान असं आहे. की, ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी, बेईमानी केलीए.. ज्यांनी शिवसेना नाव चोरलं आहे.. त्यांच्याबाबतीत हे वाक्य संजय राऊत बोलले आहेत. त्यामुळे संजय राऊतच नव्हे तर महाराष्ट्रातील, देशातील संपूर्ण जनता ही संजय राऊतांच्या वाक्याशी सहमत आहे. त्यामुळे हक्कभंग जरी पास केला असला तरी संजय राऊत या कारवाईला घाबरणार नाही.’

हे वाचलं का?

    follow whatsapp