Mumbai Tak /बातम्या / ‘संजय राऊतांनी भाजपसमोर गुडघे टेकले नाही, ते काय माफी मागतील’, कोण म्हणालं?
बातम्या राजकीयआखाडा

‘संजय राऊतांनी भाजपसमोर गुडघे टेकले नाही, ते काय माफी मागतील’, कोण म्हणालं?

Sunil Raut on Sanjay Raut: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. याच प्रकरणी विधानसभेत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग (privilege motion) दाखल करण्यात आला आहे. ज्यासाठी हक्कभंग समितीही गठीत करण्यात आली आहे. राऊतांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष हे संजय राऊतांविरोधात आक्रमक असताना दुसरीकडे संजय राऊतांचे भाऊ आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनीही सत्ताधाऱ्यांच्या या कारवाईला संजय राऊत तयार असल्याचं म्हटलं आहे. (sunil raut said sanjay raut did not kneel before bjp now what will he apologize for)

संजय राऊतांनी काहीही चुकीचं वक्तव्य केलेलं नसल्याचं सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत हे माफी मागणार नाहीत. ते भाजपसमोर झुकले नाहीत… तुरुंगात जायला घाबरले नाहीत, ते हक्कभंगाला काय घाबरणार? असं म्हणत सुनील राऊत यांनी हक्कभंगाच्या कारवाईबाबत निषेध व्यक्त केला आहे.

Sanjay राऊतांवर हक्कभंग, पण विधिमंडळाला खासदारावर कारवाई करता येते का?

‘संजय राऊतांनी भाजपसमोर गुडघे टेकले नाही, ते…’

‘संजय राऊत हे हक्कभंगाला घाबरत नाही. संजय राऊत ही घाबरणारी व्यक्ती नाही… संजय राऊतांवर जी कारवाई करतायेत ती चुकीची आहे. जे विधान संजय राऊतांनी विधानभवनच्या बाहेर म्हटलं आहे. हे विधान असं आहे. की, ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी, बेईमानी केलीए.. ज्यांनी शिवसेना नाव चोरलं आहे.. त्यांच्याबाबतीत हे वाक्य संजय राऊत बोलले आहेत. त्यामुळे संजय राऊतच नव्हे तर महाराष्ट्रातील, देशातील संपूर्ण जनता ही संजय राऊतांच्या वाक्याशी सहमत आहे. त्यामुळे हक्कभंग जरी पास केला असला तरी संजय राऊत या कारवाईला घाबरणार नाही.’

‘ईडीने सुद्धा संजय राऊतांवर चुकीची कारवाई केली. तेव्हा देखील त्यांनी भाजपसमोर गुडघे टेकले नाही. त्यांनी जेलमध्ये जाणं पत्करलं. संजय राऊत माफी मागणार नाहीत… का मागतील ते माफी? संजय राऊत माफी मागणार… शक्य आहे का? जे भाजपसमोर झुकले नाही ते माफी मागणं अजिबात शक्य नाही…’ अशी प्रतिक्रिया संजय राऊतांचे भाऊ आणि आमदार सुनिल राऊत यांनी दिली आहे.

राणे, शिरसाट करणार संजय राऊतांची चौकशी; हक्कभंग समितीमध्ये ठाकरेंना झटका

संजय राऊतांनी नेमकं काय वक्तव्य काय?

“सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. असे गेल्या सहा महिन्यात या सरकारने ईडब्ल्यूच्या माध्यमातून 28 चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला. जे विरोधात आहेत. त्यांना तुरुंगात टाकायचं. खोटे गुन्हे दाखल करायचे. बदनाम करायचं. लक्षात ठेवा. 2024 ला याचा हिशोब केला जाईल”, असं विधान संजय राऊतांनी केलं.

“ही जी बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ… हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावर काढलं तरी आम्ही काय पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली आहेत. ती आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीये. पदं गेली पदं परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे”, असं विधान संजय राऊतांनी कोल्हापुरात केलं होतं.

खरंच केसांच्या पिनने कुलूप उघडतं का? समजून घ्या कसं बाबाची एकच चर्चा!गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद Palak Tiwari: पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या इजिप्तमधल्या गर्लफ्रेंडसोबत सीक्रेट वेडिंग, आता अभिनेता बनला पिता…. IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार mumbai local mega block today : मुंबईकरांनो, सुट्टीचा प्लान आहे, मग लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या प्रियकराला विष दिलं नंतर फोनवर म्हणाली, ‘मेला नाहीस तर गळफास घे’ Health Tips: ‘या’ आजारांमध्ये लसूण खाणं ठरू शकतं खतरनाक Janhvi Kapoor: जान्हवीची ग्लॅमरस बोल्ड अदा, पण झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले प्लॅास्टिक… बागेश्वर बाबासोबत ‘ही’ तरूणी अडकणार लग्नबंधनात? जेव्हा चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याने चक्क बनवला मसाला डोसा, प्राध्यापकही झाले हैराण Kapil Sharma च्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडचा हॉट आणि बोल्ड लूक IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली