सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळेंना कोरोनाची लागण, सोशल मीडियावरून दिली माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे या दोघांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. काळजीचं काही कारण नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे सुप्रिया सुळेंचं ट्विट?

मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन संसर्ग वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. अशात राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

अधिवेशन सुरू असताना त्याच काळात राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वर्षा गायकवाड सोमवारी अधिवेशनात उपस्थित होत्या. अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिल्यानंतर ‘ताई काळजी घ्या, ताई लवकर बऱ्या व्हा, अशा प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या आहेत. तर अनेक युजर्सकडून सुप्रिया सुळे यांचे हे ट्वीट रिट्वीट करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

आज सुप्रिया सुळे यांनी त्यांची आपली चाचणी करून घेतली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तसेच त्यांचे पती सदानंद यांची देखील चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी आणि सदानंद दोघेही कोरोना पॉझिटिव आलो आहोत. दोघांची प्रकृती व्यवस्थित असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, आमच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःचे कोरोना टेस्ट करून घ्यावी ही नम्र विनंती. सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT