मुलगी रेवतीने दिलेल्या खास गिफ्टबाबत सुप्रिया सुळे यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत, म्हणाल्या..

सुप्रिया सुळे यांनी लिहिलेली पोस्ट होते आहे व्हायरल
फोटो
फोटो सुप्रिया सुळे, इंस्टाग्राम अकाऊंट

सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस बुधवारीच साजरा झाला. या वाढदिवशी मुलीने दिलेल्या खास गिफ्टबाबत सुप्रिया सुळे यांनी लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अशा तिन्ही अकाऊंट्सवर त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. सुप्रिया सुळे यांनी मुलगी रेवतीने दिलेल्या केकचा फोटो पोस्ट केला आहे.

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?

'हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट... कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडfलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ही खास पोस्ट लिहून आपल्या मुलीचं म्हणजेच रेवतीचं कौतुक केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे फोटोही त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले होते. ज्यामध्ये त्या आई प्रतिभा पवार आणि वडील शरद पवार यांच्यासोबत केक कापताना दिसत आहेत. आज सुप्रिया सुळेंनी मुलीने गिफ्ट केलेल्या केकचा फोटो शेअर केला आहे. मुलगी रेवतीने दिलेल्या या खास गिफ्टमुळे त्या भारावून गेल्या आहेत. बुधवारी त्यांचा वाढदिवस झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रातील लोकांनी सुप्रिया सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

फोटो
फोटो सुप्रिया सुळे, इंस्टाग्राम अकाऊंट

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली कृतज्ञता

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार. यावर्षी कोरोनाच्या भीषण संकटा आपण आपली अनेक जिवाभावाची माणसं गमावली. त्या सर्वांची आज आठवण येते आहे. आपण सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आपण सर्वजण माझ्यावर जो विश्वास टाकत आहात, जे प्रेम देत आहात ते सगळं अद्भुत आहे. याबद्दल मी आपणा सर्वांची ऋणी आहे. सगळ्यांचे मनापासून आभार असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in