Swara-fahad : आधी गुपचुप लग्न नंतर दणक्यात ग्रँड रिसेप्शन, मुख्यमंत्र्यांपासून दिग्गजांची हजेरी
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पक्ष नेता फहाद अहमदसोबत संसार थाटला आहे. महिन्याभरापूर्वी गुपचूप कोर्ट मॅरेज उरकलेल्या स्वरा-फहादने लग्नाआधीचे आणि नंतरचे विधीवत कार्यक्रम थाटामाटात साजरे केले. स्वरा-फहादने कव्वाली नाइटचे ही आयोजन केले होते. यावेळी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादवही दिसले. 16 मार्च रोजी दिल्लीत त्यांचं ग्रँड रिसेप्शन होतं. राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी यावेळी […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पक्ष नेता फहाद अहमदसोबत संसार थाटला आहे.
महिन्याभरापूर्वी गुपचूप कोर्ट मॅरेज उरकलेल्या स्वरा-फहादने लग्नाआधीचे आणि नंतरचे विधीवत कार्यक्रम थाटामाटात साजरे केले.
स्वरा-फहादने कव्वाली नाइटचे ही आयोजन केले होते. यावेळी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादवही दिसले.
16 मार्च रोजी दिल्लीत त्यांचं ग्रँड रिसेप्शन होतं. राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी यावेळी हजेरी लावली.
काँग्रेस नेते राहुल गांधी स्वरा आणि फहादला खास शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
जया बच्चनही स्वरा आणि फहादच्या रिसेप्शनला पोहोचल्या होत्या. त्यांनी पांढरा आणि पिवळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.
याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यावेळी हजेरी लावली.
काँग्रेस नेते शशी थरूर हेही रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते.