तेजिंदर बग्गांच्या अटकेवरून ‘फिल्मी ड्रामा’, मध्यरात्री घरात सुनावणी; काय आहे प्रकरण?
भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गांच्या अटकेवरून शुक्रवारी मोठं नाट्य रंगलं. बग्गांच्या अटकेवरून पंजाब, हरयाणा आणि दिल्ली पोलीस आमने-सामने आले. त्यानंतर मध्यरात्री उशिरा बग्गांना द्वारका न्यायालयाचे न्यायाधीश सिद्ध त्रिपाठी यांच्या घरी हजर करण्यात आले. न्यायालयाने घरी सोडण्याचे आदेश दिले. दिवसभरानंतर बग्गांची अटक नाट्यातून सुटका झाली. भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या अटकेवरून […]
ADVERTISEMENT

भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गांच्या अटकेवरून शुक्रवारी मोठं नाट्य रंगलं. बग्गांच्या अटकेवरून पंजाब, हरयाणा आणि दिल्ली पोलीस आमने-सामने आले. त्यानंतर मध्यरात्री उशिरा बग्गांना द्वारका न्यायालयाचे न्यायाधीश सिद्ध त्रिपाठी यांच्या घरी हजर करण्यात आले. न्यायालयाने घरी सोडण्याचे आदेश दिले. दिवसभरानंतर बग्गांची अटक नाट्यातून सुटका झाली.
भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या अटकेवरून पोलीस आणि राजकीय संघर्ष बघायला मिळाला. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना शुक्रवारी पंजाब पोलिसांनी घरातून अटक केली. पोलीस त्यांना मोहालीला घेऊन निघाले. त्याचवेळी कुरुक्षेत्र येथे हरयाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना रोखलं.
हरयाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांची बग्गाच्या अटकेबद्दल चौकशी केली. हे सर्व सुरू असताना दिल्ली पोलिसांचं पथक या ठिकाणी पोहोचलं. त्यानंतर हरयाणा पोलिसांनी बग्गांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं. बग्गांना पंजाब पोलिसांकडून ताब्यात घेतल्यानंतर परत दिल्लीत आणण्यात आलं.
दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर बग्गांना मध्यरात्री दिल्लीतील द्वारका सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सिद्ध त्रिपाठी यांच्या घरी हजर केलं. न्यायाधीशांनी त्यांना परत घरी पाठवण्याचे आदेश दिले.