सोमनाथ मंदिराची तोडफोड करणाऱ्या गझनीच्या कबरीवर आलो आहोत; तालिबान्याचं चिथावणीखोर ट्विट

मुंबई तक

सोमनाथ मंदिराची तोडफोड करणाऱ्या गझनीच्या कबरीवर आलो आहोत असं चिथावणीखोर ट्विट तालिबान्यांनी केलं आहे. तालिबान सरकारमधील हक्कानी नेटकवर्कचा म्होरक्या अनस हक्कानी याने आज महमूद गझनीच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्याने हे वादग्रस्त ट्विट केलं आहे. गझनी हा तोच मुस्लिम आक्रमण करणारा व्यक्ती आहे ज्याने वारंवार सोमनाथ मंदिर तोडलं. काय म्हटलं आहे हक्कानी याने? आज मुहंमद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सोमनाथ मंदिराची तोडफोड करणाऱ्या गझनीच्या कबरीवर आलो आहोत असं चिथावणीखोर ट्विट तालिबान्यांनी केलं आहे. तालिबान सरकारमधील हक्कानी नेटकवर्कचा म्होरक्या अनस हक्कानी याने आज महमूद गझनीच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्याने हे वादग्रस्त ट्विट केलं आहे. गझनी हा तोच मुस्लिम आक्रमण करणारा व्यक्ती आहे ज्याने वारंवार सोमनाथ मंदिर तोडलं.

काय म्हटलं आहे हक्कानी याने?

आज मुहंमद गझनीच्या कबरीचं दर्शन घेतलं. मुहम्मद गझनी हा तोच योद्धा आहे ज्याने मुस्लिम सत्ता स्थापन व्हावी ही महत्त्वाकांक्षा तर बाळगलीच पण शिवाय सोमनाथ मंदिरही तोडलं. या आशयाचं ट्विट हक्काने याने केलं आहे.

हे मंदिर हिंदू समुदायाने वारंवार उभारलं, पण तरीही ते तोडलं गेलं. गझनीने भारतावर चौदावेळा स्वाऱ्या केल्या होत्या. त्यात अनेकदा त्याने हिंदू मंदिरांवर आणि खास करून सोमनाथ मंदिरावर हल्ला चढवला. मुघलांचा शेवटचा सम्राट औरंगजेब याने दिलेल्या इशाऱ्यानंतर 17 व्या शतकात हे मंदिर पुन्हा उद्ध्वस्त करण्यात आलं. मात्र भारताने जिद्द सोडली नाही. आज जे सोमनाथ मंदिर आपल्याला दिसतं आहे ते भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांच्या प्रयत्नांमुळेच.

हे वाचलं का?

    follow whatsapp