Shivsena तुमच्या बापाची आहे का भो*%#? संजय राऊतांचा तोल ढळला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगली : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि ‘धनुष्य बाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताब्यात गेल्यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने निवडणूक आयोग आणि शिंदे यांना लक्ष्य केलं जातं आहे. अशातच आज (शुक्रवारी) सांगलीत बोलताना ठाकरे गटाचे (Thackeray Faction) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) असभ्य भाषेत टीका केली. तसंच हे आपण जाणीवपूर्वक बोलतं असल्याचंही सांगितलं. (Thackeray faction leader Sanjay Raut got angry while criticizing the Election Commission)

काय म्हणाले संजय राऊत?

मी जे बोलत आहे ते जाणीवपूर्वक बोलत आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या घशात आणि खिशात शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण ही निशाणी घातली आहे, तसे करायला शिवसेना तुमच्या बापाची आहे का रे भो*%#? असा सवाल करत राऊतांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सांगलीत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

“अजितदादांनी सहशिवसेनाप्रमुख होण्याची संधी गमावली…” : CM शिंदेंचा टोमणा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पन्नास खोके एकदम ओके ही स्लोगन जगप्रसिद्ध झाली , बघता बघता व्हायरल झाली. सांगली मिरजेचे आमदार फक्त शिवसेनेच्या जीवावर निवडून येतात, आता यावेळी कसे निवडून येतात ते बघू? असं आव्हानही यावेळी राऊत यांनी भाजपाला दिलं. संजय राऊत पुढे म्हणाले की , महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्याबद्दल अशी वक्तव्य करणे योग्य वाटत नाही असं मी व्यासपीठावरून बोलतो. पण जनतेच्याच ह्या भावना असतील तर मग माझा नाईलाज आहे. तसंच दिल्लीतील रंगा बिल्ला, यांच्या आदेशानुसारच हे सर्व घडत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी यावेळी बोलताना केला.

नागालँडमधील यशानंतर आठवलेंचा भाजपला पाठिंबा जाहीर; नड्डांकडे मोठी मागणी

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगाने शिवसेना जेव्हा शिंदे यांच्या हातात दिली, तेव्हापासून महाराष्ट्रात संतापाचा वणवा पेटला आहे. शिवसेना आता कोणाच्या दावणीला बांधली जाणार नाही, स्वतःच्या जीवावर निवडणुका जिंकले जातील असा विश्वास ही राऊतांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. सध्याचे सरकार हे औट घटकेचे सरकार आहे. हे सोळा आमदार नक्की अपात्र होणार, त्यांच्यावर सतत टांगती तलवार आहे. त्यांचं आजचं मरण उद्यावर गेले आहे, असंही राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

चोर गेले पण जनता आमच्या बरोबर आहेत :

आमचे भांडण आता चाळीस आमदारांबरोबर नाही त्यांना आम्ही कधीही गाडून टाकू. आमचे भांडण फक्त भाजप बरोबर आहे. कसब्याचा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवला जाईल. पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटून सुद्धा काही परिणाम झाला नाही. महाविकास आघाडीचा आमदार निवडून आला आणि कसब्यात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. आता तुमची झुंडशाही संपवण्यासाठी आमची गुंडशाही रस्त्यावर उतरावीच लागेल. आज आपल्याकडे शिवसेनेचे नाव नाही, चिन्ह नाही, आपल्याकडे काही नाही, मात्र लाखो शिवसैनिक आपल्या सोबत आहेत. धनुष्यबाण रावणाने सुद्धा उचलला होता मात्र छतावर पडला होता धनुष्यबाण कोणालाही पेलवणार नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT