ठाकरे सरकार आज ठरवणार विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख - Mumbai Tak - thackeray government will decide the date for the election of the speaker of the assembly today - MumbaiTAK
बातम्या

ठाकरे सरकार आज ठरवणार विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख

मुंबई: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन साधारण: 25 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही या पदी कुणाचीही निवड झालेली नाही. यावरुनच भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. मात्र, आता लवकरच विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. कारण आज (28 फेब्रुवारी) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची […]

मुंबई: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन साधारण: 25 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही या पदी कुणाचीही निवड झालेली नाही. यावरुनच भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. मात्र, आता लवकरच विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. कारण आज (28 फेब्रुवारी) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची नेमकी तारीख ठरवली जाणार आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख ठरविण्याआधी मंत्रिमंडळात याविषयी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे की, ही निवडणूक घेण्यासाठी राज्य सरकार योग्य स्थितीत आहे की नाही? आजच्या मंत्रिमंडळात हा विषय प्रामख्याने चर्चेला येणार असल्याने लवकरच विधानसभेला नवा अध्यक्ष मिळू शकतो.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला पत्र पाठवून विधानसभा अध्यक्षाची निवडणूक कधी घेणार? अशी विचारणा केली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानं नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिकामं झालं आहे.

ही बातमी देखील पाहा: राज्यपाल-ठाकरे सरकार वादाचा नवा अंक, कोश्यारींच्या पत्राने ठिणगी?

विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनासाठी विधानसभेचा अध्यक्ष निवडा, अशा सूचना राज्यपालांनी केल्या. पण कायदेशीर प्रक्रियेनुसार, राज्य सरकारकडून विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख राज्यपालांना कळवली जाते आणि त्यानुसार राज्यपाल हे विधिमंडळ सचिवालयाला पत्र लिहून निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या सूचना करतात.

पुन्हा एकदा बहुमत चाचणी?

नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद कोणाचं यावरून ठाकरे सरकारमध्ये कुरबुरी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता विधानसभा अध्यक्षपद सगळ्यांसाठी खुलं झालं आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. दुसरीकडे हे पद काँग्रेसकडेच राहील असं विधान काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने केलं जात आहे. खरं तर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया म्हणजे सरकारसाठी एक प्रकारची बहुमत चाचणीच असते. विधानसभा अध्यक्ष निवडणूक हा अत्यंत नाजूक असा विषय असल्याने तीनही पक्ष तो कसा हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =

या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा