बारामतीतील बिबट सफारी रद्द : अजित पवारांना धक्का; जुन्नरचे आजी-माजी आमदार खुश
पुणे : बारामतीमध्ये प्रस्तावित असलेली बिबट सफारी अखेर रद्द करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः याची माहिती दिली. तसेच ही बिबट सफारी आता जुन्नरलाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदेंचा हा निर्णय विरोधी पक्षनेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्याचवेळी जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके […]
ADVERTISEMENT

पुणे : बारामतीमध्ये प्रस्तावित असलेली बिबट सफारी अखेर रद्द करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः याची माहिती दिली. तसेच ही बिबट सफारी आता जुन्नरलाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदेंचा हा निर्णय विरोधी पक्षनेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्याचवेळी जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे दोघेही खुश झाले आहेत.
बारामती तालुक्यातील कुरण गावात प्रस्तावित बिबट्या सफारी पार्क हे जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथेच तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 15, 2022
जुन्नरचे तत्कालीन शिवसेना आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नांतून 2016 मध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जुन्नरच्या माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राच्या जोडीला आंबेगव्हाण येथे बिबट सफारीला तत्वतः मान्यता दिली होती. मात्र, हा प्रकल्प रेंगाळला होता.
त्यानंतर 2019 साली सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार यांनी आंबेगव्हाणमधील प्रस्तावित बिबट सफारीऐवजी बारामती तालुक्यातील गाडीखेल येथील बिबट सफारीसाठी 60 कोटी निधीची तरतूद केली. सुरुवातीला बिबट सफारी आणि दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी असे नियोजन करण्यात आले. यासाठी गाडीखेल येथील 100 हेक्टर जागाही निश्चित केली.
सरनाईकांविरोधात गैरसमजातून तक्रार दिली : मुख्य तक्रारदाराचा खुलासा, सोमय्यांचेही मौन