माझ्यासाठी भोंगे नाही तर महागाई आणि सामान्यांना भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे-सुप्रिया सुळे
माझ्यासाठी भोंगे नाही तर महागाईचा प्रश्न, देशाच्या आर्थिक स्थितीचा प्रश्न आणि सामान्यांना भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आत्ता जे काही देशात चाललं आहे ते करण्याची ही वेळ नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे. अहमदनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ‘3 तारखेला ईद.. तोवर मशिदीवरील भोंगे उतरवा, नाहीतर…’, […]
ADVERTISEMENT

माझ्यासाठी भोंगे नाही तर महागाईचा प्रश्न, देशाच्या आर्थिक स्थितीचा प्रश्न आणि सामान्यांना भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आत्ता जे काही देशात चाललं आहे ते करण्याची ही वेळ नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे. अहमदनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
‘3 तारखेला ईद.. तोवर मशिदीवरील भोंगे उतरवा, नाहीतर…’, राज ठाकरेंचा थेट अल्टिमेटम
काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे?
भोंग्यावरून राजकारण केलं जातं आहे. विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट केलं जातं आहे. आज मला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनी आपल्या घरी जाऊन आपल्या कुटुंबाला विचारावं की त्यांना महागाईचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो की भोंग्याचा. माझ्यासाठीही भोंग्यांचा प्रश्न महत्त्वाचा नाही तर महागाई, आर्थिक परिस्थिती आणि देशाला तसंच राज्यातल्या सामान्य माणसांना भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे आहेत.