भारताचे हे चार समलिंगी कपल; सोशल मीडियावर होत आहे यांची भरपूर चर्चा

समलिंगी जोडप्यांबद्दल जाणून घेऊया जे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात.
भारताचे हे चार समलिंगी कपल; सोशल मीडियावर होत आहे यांची भरपूर चर्चा

प्रेम कधीही जेंडर पाहत नाही. कोणीही कोणाच्याही, कुठेही प्रेमात पडू शकतो. मग ते मुलाला मुलाशी असो किंवा मुलीला मुलीशी असो. आजकाल भारतातही अनेक समलिंगी जोडप्यांनी एकमेकांशी लग्न केले आहे. अशाच काही समलिंगी जोडप्यांबद्दल जाणून घेऊया जे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात.

भारताचा स्टार स्प्रिंटर दुती चंदने नुकतेच सोशल मीडियावर असे फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वास्तविक, दुती चंद समलैंगिक आहे, जिने यापूर्वी अनेकदा हे मान्य केले आहे. यावेळी तिने त्याची गर्लफ्रेंड मोनालिसासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये दुती चंद सूट घातलेली दिसत आहे. तर तिची गर्लफ्रेंड मोनालिसा हिने लेहेंगा घातला आहे. फोटोमध्ये दोघेही लग्नाच्या वेषात स्टेजवर वधू-वरांसोबत खुर्चीवर बसलेले दिसत होते. हे फोटो बघून दोघांनी लग्न केले की काय, अशा चर्चा सुरु झाल्या. दुती चंदने तिच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर केल्यानंतर युजर्सनी पोस्टवर विविध कमेंट्स केल्या आणि भारतीय स्टार धावपटूचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे पण चाहत्यांमध्ये अजूनही एक सस्पेन्स आहे की दोघांचं खरंच लग्न झालंय की फोटोशूट आहे. की या दोघांनी हा फोटो दुसऱ्याच्या लग्नात क्लिक केला आहे?

राजस्थानच्या भरतपूरमध्ये प्रेमाखातर एका महिला शिक्षिकेने लिंग बदलून आपल्याच विद्यार्थिनीशी लग्न केले. वास्तविक, डीग येथील रहिवासी असलेल्या मीरा नागला येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात शारीरिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. गावातील रहिवासी असलेल्या कल्पनानेही याच शाळेत शिक्षण घेतले. कल्पना ही कबड्डीची चांगली खेळाडू आहे. ती तीन वेळा राष्ट्रीयस्तरावर खेळली आहे.

मीरा आणि कल्पना या शाळेत भेटत असताना प्रेमात पडतात. मीरा आणि कल्पना यांच्यातील प्रेम इतके वाढले की दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांमध्ये लिंगभावाबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. यानंतर मीराने 2019 मध्ये लिंग बदल करण्याचा निर्णय घेतला. अनेकवेळा शस्त्रक्रिया झाल्या. लिंग बदलाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती मीरापासून आरव बनली. यानंतर 4 नोव्हेंबरला त्याने त्याची विद्यार्थिनी कल्पना हिच्याशी लग्न केले. या लग्नामुळे दोघांचे कुटुंबीय खूप खूश आहेत. त्याचवेळी दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

पायल आणि यशविकाची कथाही अशीच आहे. दोघांनी ऑक्टोबर 2022 मध्ये लग्न केले. या भारतीय लेस्बियन कपलची लव्हस्टोरी सोशल मीडियावरही चर्चेत होती. एका यूट्यूब चॅनलशी बोलताना यशविका म्हणते की, मी थेट पायलला लग्नासाठी प्रपोज केले होते. ना मी त्याला आय लव्ह यू म्हणाले ना इतर कोणतीही औपचारिकता. यशविकाच्या मते, प्रेमाकडे प्रेमाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तुम्हाला फक्त प्रेमच दिसेल. गरज आहे फक्त तुमचा दृष्टीकोन बदलण्याची. यशविकाने सांगितले की, ती पायलला 2017 मध्ये टिकटॉकवर भेटली होती.

गेल्या वर्षी तेलंगणामध्येही समलिंगी पुरुषांनी आपापसात लग्न केले होते. दिल्लीचे अभय डांगे (34) आणि पश्चिम बंगालचे सुप्रियो चक्रवर्ती (31) यांनी 8 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. या समलिंगी विवाहात हळदी, मेहंदीपासून संगीतापर्यंतचे सर्व विधी पार पडले, ज्यात दोन्ही बाजूच्या कुटुंबांनी सहभाग घेतला. या लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. पण जेव्हापासून समलैंगिक विवाह सातत्याने होत आहेत, तेव्हापासून दोघांचे फोटो पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in