शिवसेनेचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख केदार दिघेंविरुद्ध गुन्हा; २३ वर्षीय तरुणीचा आरोप काय?
ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेल्या केदार दिघे यांच्याविरुद्ध एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीने फिर्याद दिली असून, यात केदार दिघेंविरुद्ध धमकी दिल्याचा, तर त्यांच्या मित्राविरुद्ध बलात्कार केल्याचा आरोप आहे. केदार दिघे यांच्या अडचणी यामुळे वाढल्या आहेत. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती […]
ADVERTISEMENT

ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेल्या केदार दिघे यांच्याविरुद्ध एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीने फिर्याद दिली असून, यात केदार दिघेंविरुद्ध धमकी दिल्याचा, तर त्यांच्या मित्राविरुद्ध बलात्कार केल्याचा आरोप आहे. केदार दिघे यांच्या अडचणी यामुळे वाढल्या आहेत.
आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एका २३ वर्षीय तरुणीनं केदार दिघे यांचे मित्र रोहित कपूरवर बलात्काराचा आरोप केला आहे. केदार दिघे आता याबाबत काय वक्तव्य करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केदार दिघे यांची नियुक्ती शिवसेना ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून झाल्यावर हे प्रकरण समोर आलं आहे.
तरुणीने तक्रारीत काय म्हटलंय? केदार दिघेंवर नेमका काय आरोप?
तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, मी हॉटेलमध्ये क्लब अॅम्बेसीडर म्हणून काम करते. मी काम करत असलेल्या हॉटेलमध्ये सहा रेस्तराँ आहेत. हॉटेलमध्ये येणाऱ्या व्यक्तींना हॉटेलच्या मेंबरशिप देण्याचं काम आहे. हॉटेलमध्येच माझी ओळख २७ जुलै २०२२ रोजी रात्री ९.४५ वाजता माझी ओळख रोहित कपूरसोबत झाली.
रोहित कपूरला मी हॉटेल मेंबरशिपबद्दल माहिती दिली. त्यांनी अगोदरपासून मेंबर असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला त्यांचा नंबर दिला. मी त्यांना व्हॉट्स अपवर मेंबरशिप घेण्याबद्दल माहिती पाठवली. २८ जुलै रोजी रात्री साडेबारा वाजता रोहित कपूरने हॉटेलची मेंबरशिप स्वीकारण्याबद्दल मेसेज केला.