अंबरनाथ हादरलं! 21 वर्षीय तरुणीला बोलावून घेत तीन मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

अंबरनाथ शहरातील जीआयपी डॅम परिसरात रविवारी दुपारी घडली घटना : जिवे मारण्याची धमकी देत केला छळ
अंबरनाथ हादरलं! 21 वर्षीय तरुणीला बोलावून घेत तीन मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

एका 21 वर्षीय तरुणीवर तीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. दारू पित बसलेल्या आरोपींनी तरुणीला फोन करून बोलवून घेतलं आणि त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत सामूहिक दुष्कृत्य केलं. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात अतिरिक्त औद्योगिक वसाहत परिसरात ग्रेट इंडियन पेनिनसुला धरण (जीआयपी डॅम) आहे. पीडिता कल्याणमध्ये राहायला असून, अंबरनाथमध्ये एका दुकानात कामाला आहे. हनुमान हिलम हा पीडितेचा मित्र आहे.

अंबरनाथ हादरलं! 21 वर्षीय तरुणीला बोलावून घेत तीन मित्रांनी केला सामूहिक बलात्कार
क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर महिलेनं पतीला नजरेसमोर करायला लावला बलात्कार

रविवारी दुपारी हनुमान हिलम हा त्याचे मित्र विश्वास मढवी आणि जावेद अन्सारी यांच्यासोबत जीआयपी डॅम परिसरात दारू पित बसले होते. याचदरम्यान हनुमान हिलम याने पीडित तरुणीला फोन केला. आरोपीने तरुणीला जीआयपी डॅम परिसरात येण्यास सांगितलं.

महत्त्वाचं म्हणजे तरुणीला आणण्यासाठी आरोपीने रिक्षाही पाठवली होती, अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर तरुणी बोलावलेल्या ठिकाणी गेली. तरुणी बसलेली असताना आरोपी दारू पित बसले. त्यानंतर त्यांनी पीडितेला घाबरवण्यास सुरूवात केली. यावेळी आरोपीने तिला जिवे मारण्याचीही धमकी दिली आणि बलात्कार केला.

अंबरनाथ हादरलं! 21 वर्षीय तरुणीला बोलावून घेत तीन मित्रांनी केला सामूहिक बलात्कार
पोलिसाने नोकरीचं आमिष दाखवून केला बलात्कार, यवतमाळमधील 'त्या' तरुणीच्या आत्महत्येचं गुढ उकललं

त्यानंतर हनुमान हिलम याचे मित्र विश्वास मढवी आणि जावेद अन्सारी यांनीही तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनं हादरून गेलेल्या तरुणीने थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन झालेला प्रकार सांगितला.

अंबरनाथ हादरलं! 21 वर्षीय तरुणीला बोलावून घेत तीन मित्रांनी केला सामूहिक बलात्कार
Crime: चर्चचा पाद्री निघाला विकृत नराधम, अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पत्नी करायची व्हीडिओ शूट

पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांना न्यायालयात हजर केलं जाणार असून, प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in