पिंपरीत 14 देशी पिस्तुलं आणि 8 गोळ्यांसह तीन दरोडेखोर गजाआड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समीर शेख, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने 14 देशी पिस्तुलं आणि 8 जिवंत काडतुसांसह तिघांना ताब्यात घेतले आहे पिंपरी-चिंचवड शहराच्या लगत असलेल्या चरोली वडमुखवाडी परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी या टोळीवर कारवाई करत तिघांना जेरबंद केले आहे तर त्यांचे इतर दोन साथीदार हे घटनास्थळावरून फरार झाले आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

या गुन्ह्याविषयी मिळालेल्या माहिती अनुसार आकाश अनिल मिसाळ, रुपेश सुरेश पाटील आणि रितिक दिलीप तापकीर अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर त्यांच्या फरार झालेल्या दोन साथीदारांच्या मागावर आता पोलीस आहेत. दरोडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी सागर शेंडगे हे वडमुखवाडी परिसरात पेट्रोलिंग करत असतानाच त्यांना या टोळीच्या सदस्यांवर संशय आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी आपल्या टीमसह संबंधित ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी वरील या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन देशी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर ही महत्त्वाची माहिती या आरोपींनी पोलिसांना सांगितली की या व्यतिरिक्त 12 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 6 काडतुसेही त्यांच्याकडे आहेत त्यानंतर पोलिसांनी एकूण 14 देशी बनावटीचे पिस्तुले आणि 8 जिवंत काडतुसं या आरोपींकडून जप्त केली

अटक करण्यात आलेल्या या आरोपींकची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी पोलिसांना असे सांगितले की पिंपरी-चिंचवड शहरांमधील काही लोकांना ही शस्त्रं विकण्याच्या प्रयत्नात ते होते. संबंधित सर्व हत्यारे आणि काडतुसे त्यांनी मध्य प्रदेश राज्यातून विकत घेतले होती. तर वडमुखवाडी परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे त्यांना ही हत्यारे शहरात विक्री करता आली नाहीत.

ADVERTISEMENT

यापूर्वीही पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दरोडा पथक विभागाने देशी बनावटीची 24 पिस्तुले जप्त केली होती. ही पिस्तुलंही मध्य प्रदेश राज्यातूनच पिंपरी चिंचवड शहरात विक्रीसाठी आणण्यात आली होती. त्यामुळे आता पोलिसांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो आहे की मध्यप्रदेशचे स्थानिक पोलिस प्रशासन या लोकांवर का कारवाई करत नाही? जे लोक या धंद्यामध्ये सहभागी आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT