व्हायरल झालेल्या त्या घटस्फोटाच्या सोहळ्याचं रहस्य उलगडणार लवकरच - Mumbai Tak - trending secret of divorce revealed soon mangalashtak return shoot started in marathi - MumbaiTAK
बातम्या मनोरंजन

व्हायरल झालेल्या त्या घटस्फोटाच्या सोहळ्याचं रहस्य उलगडणार लवकरच

सध्या सोशल मिडियावर घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या सोहळ्याने तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडले आहे. एवढंच बाकी राहील होत, आता हे ही पाहायला मिळाल, पुणे तिथे काय उणे, पाटलाचा नादच खुळा, लोक कशाचे सोहळे करतील सांगता येत नाही अशा कमेंट्सने तर हाहाकार माजवला आहे. घटस्फोट सोहळ्याची चाललेली जय्यत तयारी […]

सध्या सोशल मिडियावर घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या सोहळ्याने तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडले आहे. एवढंच बाकी राहील होत, आता हे ही पाहायला मिळाल, पुणे तिथे काय उणे, पाटलाचा नादच खुळा, लोक कशाचे सोहळे करतील सांगता येत नाही अशा कमेंट्सने तर हाहाकार माजवला आहे. घटस्फोट सोहळ्याची चाललेली जय्यत तयारी पाहता नक्की हा प्रकार काय आहे या विचाराने साऱ्यांनाच चिंतेत पाडले आहे. असा हा घटस्फोट सोहळा साऱ्यांनाच अचंबित करून सोडणारा आहे. चार दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला हा सोहळा काही घटस्फोट सोहळा नसून ‘मंगलाष्टक रिटर्न’ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटा अंतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा एक भाग आहे. नक्की घटस्फोट सोहळ्याची थीम काय आहे, हा आगळावेगळा सोहळा कशाचे भाकीत उलगडणार आहे याकडे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत. चित्रीकरणास सुरुवात होऊन अवघे चारच दिवस झाले असून या चित्रपटा अंतर्गत होणाऱ्या या घटस्फोट सोहळ्याने तर हाहाकारच माजवला आहे त्यामुळे प्रेक्षकांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक,आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शहा, अभिनेत्री श्वेता खरात, प्रसन्ना केतकर, शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले, कमलेश सावंत, समीर पौलस्ते अभिनेत्री प्राजक्ता नेवळे, सोनल पवार,भक्ती चव्हाण, शीतल ओस्वाल यांच्या ही दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत.

लॉकडाउन नंतर चित्रपट सृष्टीला मिळालेल्या ग्रीन सिग्नल दरम्यान या ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला होता. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा चित्रपट असून एका नव्या कोऱ्या विषयाचा आणि कोड्यात टाकणारा दमदार विषय घेऊन हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हिंजवडी पुणे येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच घटस्फोट सोहळा असे नाव असलेल्या कमानीचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. आणि फोटोसह बऱ्याच मनोरंजक अशा कमेंट्सचा माराही पाहायला मिळाला.दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मितीची धुरा निर्माता वीर कुमार शहा यांनी सांभाळली आहे. त्यांच्या ‘शारदा प्रॉडक्शन’ या प्रॉडक्शन हाऊसतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘बाजार’ या चित्रपटातून अभिनेता, दिग्दर्शक योगेश भोसले प्रेक्षकांच्या समोर आला. ‘बाजार’ या त्यांनी केलेल्या दिग्दर्शित चित्रपटाला 16 अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांचा ‘मंगलाष्टक रिटर्न’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. त्यामुळे या अचंबित करून टाकणाऱ्या सोहळ्याची नेमकी कथा काय असेल याची साऱ्या सिनेरसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. आता हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस केव्हा येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + 3 =

विस्मरणाचा असेल आजार तर एवढंच करा दुधामध्ये फक्त ‘ही’ चार पानं टाका Tadoba: सगळ्यांसमोर भिडले दोन वाघ, रक्तबंबाळ झाले अन्.. दररोज Squats करा; मिळतील ‘हे’ 7 अप्रतिम फायदे! फिरायचा प्लान करताय? मुंबईपासून काही अंतरावर असलेली ‘ही’ ठिकाणं करा Explore रम आणि ब्रँडीमध्ये ‘हा’ आहे फरक… ‘या’ 5 टेक्निक्सने Hip Fat झटपट करा दूर! Team India सोबत विमानात कोण होती ती ‘मिस्ट्री गर्ल’, पाहा PHOTO सनी देओल दिसला दारूच्या नशेत, व्हिडीओ व्हायरल… ‘Animal’ मध्ये रणबीरसोबत रोमान्स, अभिनेत्रीचा ग्लॅमरस-हॉट लुक पाहिला का? Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss Weight Loss: महिन्याभरातच कसं व्हायचं स्लिम-फिट? दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन! गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा ‘या’ छोट्या टिप्स… डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये? तुमचं सौंदर्य चाळीशीतही राहील सुंदर अन् निरागस; फक्त ‘या’ 3 गोष्टी नेहमी करा फॉलो! Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात