वसईच्या सुरूची समुद्र किनारी दोन तरूण बुडाले, लॉकडाऊनमधलं पर्यटन बेतलं जिवावर
लॉकडाऊनमधलं पर्यटन दोन तरूणांच्या जिवावर बेतलं आहे. कारण वसईच्या सुरूची समुद्र किनाऱ्यावर मजा करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. नालासोपारा या ठिकाणी राहणारं कुटुंब हे सुरूची समुद्र किनाऱ्यावर आलं होतं. त्यातील काही तरूण दुपारनंतर समद्र किनारी पोहण्यास गेलं. त्यावेळी समुद्र खवळलेला होता. पाण्याच्या लाटांसोबत यामधले दोन तरूण खेचले गेले. तसंच पाण्याचा अंदाज न […]
ADVERTISEMENT

लॉकडाऊनमधलं पर्यटन दोन तरूणांच्या जिवावर बेतलं आहे. कारण वसईच्या सुरूची समुद्र किनाऱ्यावर मजा करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. नालासोपारा या ठिकाणी राहणारं कुटुंब हे सुरूची समुद्र किनाऱ्यावर आलं होतं. त्यातील काही तरूण दुपारनंतर समद्र किनारी पोहण्यास गेलं. त्यावेळी समुद्र खवळलेला होता. पाण्याच्या लाटांसोबत यामधले दोन तरूण खेचले गेले. तसंच पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. अजित विश्वकर्मा आणि रणजीत विश्वकर्मा अशी या दोघांची नावं आहेत.
अजित विश्वकर्मा हा 15 वर्षांचा होता तर रणजीत विश्वकर्मा हा 20 वर्षांचा होता. हे दोघेही चुलत भाऊ आहेत अशीही माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी या दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास दोघांचे मृतदेह मिळाले. वसई पोलिसांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. वसई पोलीस अकस्मात मृत्यूंची नोंद या प्रकरणी करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात पिकनिकला जाणं हे या दोन मुलांच्या जिवावर बेतलं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?