Shiv Sena UBT: “अमित शाहांची विधाने म्हणजे सरकारचा केमिकल लोचा झाल्याचा पुरावा”
Saamana Editorial: देशात लोकशाहीच्या नावाने ‘धमकी राज’ सुरू झाले आहे, असं म्हणत सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना लक्ष्य केलं आहे. अमित शाह यांची विधाने म्हणजे केंद्र सरकारचा केमिकल लोचा झाला असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. सामना अग्रलेखात ठाकरेंनी काय केली टीका? “देशाचे विद्वान गृहमंत्री अमित शहा […]
ADVERTISEMENT

Saamana Editorial: देशात लोकशाहीच्या नावाने ‘धमकी राज’ सुरू झाले आहे, असं म्हणत सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना लक्ष्य केलं आहे. अमित शाह यांची विधाने म्हणजे केंद्र सरकारचा केमिकल लोचा झाला असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.
सामना अग्रलेखात ठाकरेंनी काय केली टीका?
“देशाचे विद्वान गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानींवर अखेर तोंड उघडले आहे. अदानी यांच्या संदर्भात कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. उगाच विनाकारण आरोप करून काय उपयोग? असे सांगत केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातल्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारास एक प्रकारे कवचकुंडलेच प्रदान केली. शहा यांनी आणखी एक मजेशीर विधान केले. त्यांनी असा विनोद केला की, सर्व कॉमेडी शो त्यापुढे फिके पडावेत. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे काम अत्यंत निष्पक्ष पद्धतीने सुरू आहे असे ते म्हणाले. शहा यांची ही विधाने म्हणजे केंद्र सरकारच्या मेंदूचा एक प्रकारे जो केमिकल लोचा झाला आहे, त्याचा पुरावा आहे.”
“अदानी यांच्या विरोधात कोर्टात जा, असे गृहमंत्री अमित शहा सांगतात. मग यावेळी ईडी वगैरे निष्पक्ष संस्था काय करत आहेत? हाच प्रश्न आहे. अदानींच्या विरोधात लोकांनी न्यायालयात जायचे, पण त्याच वेळी कायदामंत्र्यांनी, रिजिजू यांनी न्यायालयांना जाहीरपणे धमक्या द्यायच्या. रिजिजू हे न्यायव्यवस्थेविरुद्ध बेबंदपणे बोलत आहेत. ‘काही निवृत्त न्यायाधीश भारतविरोधी टोळीत आहेत व त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. हे निवृत्त न्यायमूर्ती न्यायपालिकेला सरकारविरुद्ध उभे करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,’ अशी धमकीची भाषा न्यायमूर्तींच्या बाबतीत देशाच्या कायदामंत्र्यांनी करावी हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव म्हणायला हवे.”
पवारांनी तुमच्या डोक्यात मुख्यमंत्रिपदाचा बल्ब पेटवला अन् सगळंच…: CM शिंदे