UPSC Result : महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकर राज्यात आली पहिली

मुंबई तक

UPSC Result केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीही निकालात मुलींचा दबदबा पाहण्यास मिळतो आहे. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. मुंबईच्या प्रियंवदा म्हाडदळकरने गुणवत्ता यादीत १३ वी रँक मिळवली आहे, महाराष्ट्रात प्रियंवदा पहिली आली आहे. UPSC Civil Services Final Result 2021: नागरी सेवा परीक्षेत मुलींचाच डंका, अंतिम निकाल जाहीर व्हीजेटीआय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

UPSC Result केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीही निकालात मुलींचा दबदबा पाहण्यास मिळतो आहे. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. मुंबईच्या प्रियंवदा म्हाडदळकरने गुणवत्ता यादीत १३ वी रँक मिळवली आहे, महाराष्ट्रात प्रियंवदा पहिली आली आहे.

UPSC Civil Services Final Result 2021: नागरी सेवा परीक्षेत मुलींचाच डंका, अंतिम निकाल जाहीर

व्हीजेटीआय कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण प्रियंवदाने पूर्ण केलं आहे. त्यानंतर आयआयएम बंगळुरूतून तिने MBA पूर्ण केलं. भारतात प्रियंवदा म्हाडदळकर तेराव्या क्रमांकाने उतीर्म झाली आहे. प्रियंवदा मूळची रत्नागिरीची असून तिचं शिक्षण मुंबईत झालं आहे. २०२० मध्ये प्रियंवदाने नोकरी सोडली आणि त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात हे मोठं यश मिळवलं.

प्रियंवदाला लहानपणापासूनच IAS ऑफिसर होण्याची इच्छा होती. प्रियंवदाचे वडील सरकारी नोकरीत होते, त्यांच्याकडूनच प्रियंवदाने शासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा घेतली. २०२० ला तिने स्थिरस्थावर असलेली नोकरी सोडून UPSC ची परीक्षा दिली. त्यात तिला यश मिळालं नाही पण दुसऱ्या प्रयत्नात मात्र तिने यश मिळवलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp