वीर सावरकर, आकाशवाणीचा वाद याबाबत भाष्य करण्यास हृदयनाथ मंगेशकर यांचा नकार
वीर सावरकर, आकाशवाणी या सगळ्या विषयांवर बोलण्यास पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी नकार दिला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना वीर सावरकर यांचं ने मजसी ने परत मातृभूमीला हे गाणं संगीतबद्ध केल्याने त्यांना आकाशवाणीतून काढून टाकण्यात आलं होतं. हा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला होता आणि त्यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
ADVERTISEMENT

वीर सावरकर, आकाशवाणी या सगळ्या विषयांवर बोलण्यास पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी नकार दिला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना वीर सावरकर यांचं ने मजसी ने परत मातृभूमीला हे गाणं संगीतबद्ध केल्याने त्यांना आकाशवाणीतून काढून टाकण्यात आलं होतं. हा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला होता आणि त्यावरून बराच वादंग निर्माण झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत हा उल्लेख केला होता. तसंच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हृदयनाथ मंगेशकर यांनी हे सांगितल्याचं उदाहरणही दिलं होतं. मात्र आज या सगळ्या विषयावर भाष्य करण्यास हृदयनाथ मंगेशकर यांनी नकार दिला आहे.
आज हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पंडित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर केले. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.