मनोज जरांगे पाटील यांच्या गावातील बजरंग सोनावणेंची पेढे तुला
बजरंग सोनावणे विजयी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या गावात पेढे तुल्याचा नवस फेडण्यात आला.

ADVERTISEMENT
बीडचे खासदार बजरंग सोनावणे विजयी झाल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ मातोरी गावात सोनवणे यांची पेढे तुला करून ग्रामस्थांना त्याचे वाटप करण्यात आले. बजरंग सोनवणे लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर पेढे तुला करू असा नवस मातोरी येथील आसाराम जरांगे यांनी केला होता. हा नवस पूर्ण झाल्यानंतर आज श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भालकेश्वर संस्थान महादेव मंदिरात सोनवणे यांची पेढे तुला करण्यात आली. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, मेहबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.