निवडणुकीसाठी 'होऊ दे खर्च'! शिंदेंची खैरात, कोणाला धक्का?

मुंबई तक

महायुती सरकारने सप्टेंबरच्या पहिल्या 9 दिवसात 484 शासन निर्णय जारी केलेत. यातली विशेष बाब म्हणजे गोष्टी निवडणुकीच्या तयारीसाठी आहेत, हे स्पष्ट होते.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

महायुती सरकारने सप्टेंबरच्या पहिल्या 9 दिवसात 484 शासन निर्णय जारी केलेत. यातली विशेष बाब म्हणजे गोष्टी निवडणुकीच्या तयारीसाठी आहेत, हे स्पष्ट होते.

social share
google news

महायुती सरकारने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 9 दिवसातच 484 शासन निर्णय जारी केलेत. यातले 370 शासकीय निर्णय हे फक्त 4 दिवसात म्हणजे 4, 5, 6, 9 सप्टेंबरला काढले गेले. यातील विशेष म्हणजे सप्टेंबर 4 आणि 5 तारखेला प्रतिदिन 118 जीआर काढण्यात आले. गेल्या दोन महिन्यांमध्ये जीआर काढण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि हे विशेषकरून विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर झाले आहे. यावरून स्पष्ट होते की, सरकारची निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. आगामी दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका होऊ शकतात आणि त्याच्या आधीची ही घाई सरकार करत आहे. नेमकी ही घाई का केली जात आहे? जाणून घ्या INSIDE STORY.

    follow whatsapp