Maharashtra Weather : 'या' जिल्ह्यांसाठी पुढील 48 तास महत्वाचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

मुंबई तक

गेल्या दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान मांडले आहे आणि पुढील ४८ तास अतिशय महत्वाचे आहेत. हवामान विभागाने काही गंभीर अलर्ट जारी केले आहेत.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Maharashtra Weather : गेल्या दोन दिवसांत विदर्भासोबत मराठवाड्यात मोठ्या पावसाने थैमान मांडले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने काही गंभीर अलर्ट जारी केले आहेत. कुठल्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हे समजून घेऊयात. पुढील ४८ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, या भागात रहाणा-रया नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. स्थानिक प्रशासनाने मदतीच्या कार्यात तीव्र गतीने सहभागी होण्याची तयारी ठेवली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि पावसाच्या काळात सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. पुढील काही दिवसांत हवामानाची स्थिती अधिक उग्र होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचना काटेकोर पाळाव्यात. पुढील ४८ तासांत मुसळधार पावसामुळे होणाऱ्या संभावित आणीबाणीच्या परिस्थीतीविषयी आपले लक्ष सदैव ठेवावे.

    follow whatsapp