मंच सोडला, त्राण गेले, पदरानं हवा घेतली, वाट काढत अॅम्ब्युलन्स निघाली, सगळा ड्रामा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटलांचं सहावं आमरण उपोषण आज स्थगित झालंय. मराठा आंदोलक मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल झाले होते.

social share
google news

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं सहावं आमरण उपोषण आज स्थगित झालंय. अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हस्ते पाणी पीत जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र 8 दिवस उपोषण करून प्रकृती बिघडल्याने अंतरवाली सराटीत काल रात्री मराठा आंदोलकांनी आक्रोश केला होता. त्यांनतर जरांगे यांना समाजाच्या वेदना सहन न झाल्याने त्यांनी आज उपोषणाच्या नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेत उपोषण स्थगित केलंय. यावेळी राज्य भरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल झाले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT