‘काँग्रेसची भूमिका न्यायाला धरून नाही’, सुधीर तांबेंनी मांडली भूमिका

मुंबई तक

-प्रवीण ठाकरे, नाशिक एबी फॉर्म देऊनही उमेदवारी अर्ज दाखल न केल्यानं काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर सुधीर तांबे यांनी ट्विट (Tweet) करत काँग्रेसच्या निलंबनाच्या निर्णयावर भूमिका मांडली आहे. (Sudhir Tambe tweet after congress action) नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये अतंर्गत वाद निर्माण झालाय. डॉ. सुधीर तांबे […]

ADVERTISEMENT

google news

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये अतंर्गत वाद निर्माण झालाय. डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडून नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. मात्र, सुधीर तांबे यांनी मुलगा सत्यजित तांबेंसाठी माघार घेतली. काँग्रेसच्या शिस्त पालन समितीकडून सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Nashik MLC Election : सुधीर तांबे निलंबित, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा

काँग्रेसनं सुधीर तांबेंनी अर्ज न भरल्याच्या प्रकरणाची चौकशी लावली असून, चौकशीपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर सुधीर तांबे यांनी ट्विट करत त्यांची भूमिका मांडली आहे.

निलंबनाच्या कारवाईवर सुधीर तांबे काय म्हणाले? (Sudhir Tambe tweet)

सुधीर तांबे यांनी पक्षाच्या निलंबनाच्या कारवाईनंतर एक ट्विट केलं. ज्यात ते म्हणतात, “माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे”, अशी भूमिका सुधीर तांबे यांनी मांडली आहे.