विराट कोहलीच्या राजीनामा पत्रात फक्त दोन नावांचा उल्लेख, पद सोडताना नेमकं काय म्हणाला कोहली?
T20 आणि एकदिवसीय कर्णधार पदानंतर आता विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरोधातली कसोटी गमावल्यानंतर विराट कोहलीने निर्णय जाहीर केला. सोशल मीडियावर पोस्ट लिहून विराट कोहलीने त्यांना निर्णय जाहीर केला. विराट कोहलीने त्याच्या राजीनामा पत्रात दोन नावांचा उल्लेख केला आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे विराट कोहलीने? ‘सात वर्षांची मेहनत आणि […]
ADVERTISEMENT

T20 आणि एकदिवसीय कर्णधार पदानंतर आता विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरोधातली कसोटी गमावल्यानंतर विराट कोहलीने निर्णय जाहीर केला. सोशल मीडियावर पोस्ट लिहून विराट कोहलीने त्यांना निर्णय जाहीर केला. विराट कोहलीने त्याच्या राजीनामा पत्रात दोन नावांचा उल्लेख केला आहे.
जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे विराट कोहलीने?
‘सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडलेली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच योग्य वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही, किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा 12- टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.