बारामती : तीन महिन्यांत कलिंगड विक्रीतून कमावला ९ लाखांचा नफा

मुंबई तक

– वसंत मोरे, बारामती प्रतिनिधी शेती परवडत नाही अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते. परंतू जिद्द-चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर भाडेतत्त्वावर केलेल्या शेतीमध्ये देखील लाखो रुपयांचा फायदा मिळवता येतो. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या मावडी गावच्या उच्चशिक्षित पवार कुटुंबाने हे सिद्ध करुन दाखवले आहे. विशाल पवार आणि सागर पवार हे दोघे सख्खे भाऊ. त्यांची पुरंदर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– वसंत मोरे, बारामती प्रतिनिधी

शेती परवडत नाही अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते. परंतू जिद्द-चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर भाडेतत्त्वावर केलेल्या शेतीमध्ये देखील लाखो रुपयांचा फायदा मिळवता येतो. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या मावडी गावच्या उच्चशिक्षित पवार कुटुंबाने हे सिद्ध करुन दाखवले आहे.

विशाल पवार आणि सागर पवार हे दोघे सख्खे भाऊ. त्यांची पुरंदर तालुक्यात मावडी गावात एक शेती आहे. दोघांनीही शेतकी विषयातून बीएससीचं शिक्षण घेतलेले आहे. पवार कुटुंबातील इतर सदस्यही उच्चशिक्षित आहेत. परिसरातील शेतक-यांना मार्गदर्शन करत वडिलोपार्जित असलेल्या एक एकर शेतीमध्ये पवार कुटुंबाने कलिंगड आणि खरबूजची शेती करायला सुरुवात केली. गेली चार वर्ष पवार कुटुंबाला कलिंगडांतून चांगले उत्पन्नही मिळालं.

मात्र गेल्या वर्षी कलिंगडाचा तोडा सुरू असतानाच कोरोनाच्या संकटाने लॉकडाऊन लागलं. हातातोंडाशी आलेला घास कवडीमोल किमतीने विकावा लागणार त्यामुळे पवार कुटुंबीय अस्वस्थ झाले. परंतू हार न मानता त्यातून मार्ग काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूला स्टॉल लावून कलिंगडाची विक्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला आणि अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्नही मिळालं.

हे वाचलं का?

    follow whatsapp