महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार का? नेमकं काय म्हणाले अजित पवार?
हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवसापासून चांगलंच तापलं आहे. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर भाजपने राडा घातला. पहिला दिवस त्यामध्ये गेल्यानंतर आता दुसरा दिवस महत्त्वाचा ठरला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे. सभागृहात मास्क न घालून येणाऱ्या सदस्यांवर अजित पवार चांगलेच संतापले. लॉकडाऊनबाबतही महत्त्वाचं भाष्य अजित पवारांनी केलं आहे. हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात […]
ADVERTISEMENT

हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवसापासून चांगलंच तापलं आहे. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर भाजपने राडा घातला. पहिला दिवस त्यामध्ये गेल्यानंतर आता दुसरा दिवस महत्त्वाचा ठरला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे. सभागृहात मास्क न घालून येणाऱ्या सदस्यांवर अजित पवार चांगलेच संतापले. लॉकडाऊनबाबतही महत्त्वाचं भाष्य अजित पवारांनी केलं आहे.
हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भित्रं सरकार पाहिलेलं नाही’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी
काय म्हणाले अजितदादा?
‘कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. ओमिक्रॉन या व्हायरस व्हेरिएंटचा धोका आहेच. अजून एक कुणीतरी त्याचा भाऊ असलेला विषाणूही आलाय म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाच्या व्हायरस व्हेरिएंची गंभीर दखल घेतली आहे. वेळ पडली तर राज्यसह देशभर रात्रीचा लॉकडाऊन लावण्यासंबंधीचा विचार सुरू आहे.’ असं महत्त्वाचं वक्तव्य अजितदादांनी आज सभागृहात केलं आहे.