सचिन वाझे अडचणीत आलेलं ख्वाजा युनूस प्रकरण नेमकं आहे तरी काय?
मुंबई: मुंबई पोलिसातील अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनं एकच खळबळ उडाली आहे. पण सचिन वाझे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांचं अशा वादग्रस्त प्रकरणात नाव आलं आहे. एनआयएपुढे चौकशीसाठी हजर राहण्यासाठी जाताना त्यांनी आपल्या व्हॉट्सअपवर एक स्टेट्स पोस्ट केलं होतं. त्या पोस्टमध्ये त्यांनी जवळपास १७ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाची सल बोलून दाखवली होती. […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई पोलिसातील अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनं एकच खळबळ उडाली आहे. पण सचिन वाझे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांचं अशा वादग्रस्त प्रकरणात नाव आलं आहे.
एनआयएपुढे चौकशीसाठी हजर राहण्यासाठी जाताना त्यांनी आपल्या व्हॉट्सअपवर एक स्टेट्स पोस्ट केलं होतं. त्या पोस्टमध्ये त्यांनी जवळपास १७ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाची सल बोलून दाखवली होती. तसंच एक धक्कादायक विधानही त्यांनी या पोस्टमध्ये केलं होतं.
या स्टेट्स पोस्टमध्ये वाझे म्हणाले होते, ‘३ मार्च २००४ ला मला सीआयडी अधिकाऱ्यांनी अटक केली. एका चुकीच्या केसमध्ये मला अडकवण्यात आलं. ती केस अजूनही अनिर्णित आहे. आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे.’
‘माझे सहकारी अधिकारी मला खोट्या प्रकरणात अडकवू पाहात आहेत. मात्र तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत प्रचंड फरक आहे. तेव्हा माझ्याकडे १७ वर्षे होती. केसमधून बाहेर येईन अशी आशा होती, आयुष्य आणि नोकरीची वर्षेही होती. आता माझ्याकडे पुढची १७ वर्षे काहीही नाही. तसंच माझ्यातली सहनशक्तीही आता संपत चालली आहे. मी या विचारात आहे की जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे.’