
कर्नाटक राज्यातील शिवमोग्गामध्ये स्वातंत्र्यदिनीच कर्फ्यू अर्थात जमावबंदी लावण्याची वेळ आली होती. वीर सावरकर यांच्या पोस्टरवरुन झालेल्या वादामुळे तणाव वाढला आणि अखेर प्रशासनानं खबरदारी म्हणून कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या शिवमोग्गमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. तसंच पोलीस बंदोबस्तामध्येही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
शिवमोग्गा येथील अमीर अहमद सर्कल इथं वीर सावरकर यांचे पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर हिंदूंच्यावतीने लावण्यात आल्याचा आरोप काही मुस्लिम लोकांनी केल्याची बामती समोर आली होती. हिंदू समर्थकांनी लावलेल्या विनायक दामोदर सावरकरांच्या पोस्टरला मुस्लिम युवकांनी विरोध दर्शवला. त्यानंतर हे पोस्टर काढण्यात आले होते. दरम्यान, यानंतर काही हिंदू कार्यकर्त्यांनी सावकरांचे पोस्टर काढल्यामुळे त्याचा निषेध नोंदवलास होता. त्यामुळे तणाव वाढला. अखेर प्रशासनाला खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचं कलम लागू करावं लागलं.
त्याअगोदर सोशल डेमोक्रेटी पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारच्या आणखी एका घटनेत सावरकरांचं नाव हटवल्यामुळे बॅनर लाऊन निषेध व्यक्त केला होता. मंगळुरु पालिकेने एका सर्कलला सावकरांचं नाव देण्याचं ठरवलं होतं. त्याबाबतचा प्रस्तावही मंजूर केला होता. मंगळुरु उत्तरचे भाजप आमदार वाई भरत शेट्टी यांनी सर्कलला वीर सावरकर यांचं नाव दिलं जावं अशी मागणी केली होती.
दरम्यान शिवमोग्गा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चाकूहल्लाप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी चार जणांना अटक केली. आतापर्यंत, पोलिसांनी नदीम (25), अब्दुल रहमान (25) आणि जबीउल्लाह या चारपैकी तीन जणांची ओळख उघड केली आहे. पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या जबीउल्लाच्या पायात गोळी लागली आहे.
स्वातंत्र्यदिनी अमीर अहमद सर्कल येथे लावलेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या पोस्टरवरचा वाद उफाळून आल्याच्या काही तासांनंतर शिवमोग्गा येथील गांधी बाजार परिसरात प्रेमसिंग नावाच्या एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर यांना अटक करण्यात आली आहे. सावरकर आणि 18व्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांचा फ्लेक्स लावण्यावरून सोमवारी दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती.