Pegasus Spyware कसे काम करते आणि WhatsApp हॅक कसे करते?
इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने तयार केलेलं पेगॅसस हे स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. विविध खात्यांचे मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते यांची मोबाईलच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचं प्रोजेक्ट पेगाससमधून समोर आलं होतं. न्यूयॉर्क टाइम्सने यासंदर्भातील एक रिपोर्ट प्रसिद्ध केल्यानंतर पेगासस स्पायवेअरवरून देशातील राजकारण तापलं आहे. Pegasus ची चर्चा […]
ADVERTISEMENT

इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने तयार केलेलं पेगॅसस हे स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. विविध खात्यांचे मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते यांची मोबाईलच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचं प्रोजेक्ट पेगाससमधून समोर आलं होतं. न्यूयॉर्क टाइम्सने यासंदर्भातील एक रिपोर्ट प्रसिद्ध केल्यानंतर पेगासस स्पायवेअरवरून देशातील राजकारण तापलं आहे.
Pegasus ची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. याबाबत आपण याआधी ऐकलं होतं ते 2019 मध्ये. त्यावेळी काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते य़ांना व्हॉट्स अॅपवर पेगासससंबंधी काही मेसेजस आले होते.
काय आहे Pegasus Spyware?
पेगासस स्पायवेअर हे इस्रायलच्या NSO ग्रुपने विकसित केलं आहे. ही कंपनी सायबर वेपन कंपनी म्हणून जगप्रसिद्ध आहे. ही कंपनी चर्चेत आली ती 2016 मध्ये. त्यावेळी एका अरब कार्यकर्त्याला त्याच्या मोबाईलवर एक संशयास्पद मेसेज आला होता. त्यावेळी त्याला हे वाटत होते की पेगाससद्वारे आयफोन वापरकर्त्यांचे फोन हॅक केले जात आहे. यानंतर अनेक दिवस गेले, ज्यानंतर Apple कंपनीने iOS चं अपडेटेड व्हर्जन आणलं. त्यावेळी त्यांनी हा दावा केला की आम्ही यातल्या त्या सगळ्या कमतरता दूर केल्या आहेत ज्या पेगाससद्वारे हॅक केल्या जाऊ शकतात.