WhatsApp ची मोठी घोषणा! आत्तापर्यंत सर्वात जबरदस्त फिचर! वाचा काय आहे खासियत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Facebook चे फाऊंडर मार्क झुकरबर्ग यांनी What’s App वर Communities फिचर रोलआऊट करण्याची घोषणा केली आहे. हे नवं फिचर आणण्यास थोडासा अवधी लागू शकतो. मात्र हे फिचर येणं ही Whats App युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Whats App च्या Communities फिचरबाबत कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीलाच घोषणा केली होती. कंपनीने काही झोनमध्ये या फिचरचं टेस्टिंग केलं. या फिचरमुळे युजर्स ग्रुपमध्ये कनेक्ट होऊ शकणार आहे. हे फिचर म्हणजे ग्रुपच्या आत असलेला ग्रुप आहे. म्हणजेच तुम्ही एका ग्रुपमध्ये काही विशिष्ट लोकांना घेऊन सब ग्रुप तयार करू शकता.

WhatsApp Communities फिचर कंपन्या, शेजारी, शाळा तसंच कामाची ठिकाणं या सगळ्यांसाठी उपयुक्त फिचर असणार आहे. युजर्स एका मोठ्या ग्रुपवर मल्टिपल ग्रुपवर कनेक्ट करू शकतात. यासाठी What’s App कंपनी ५० हून जास्त संस्था आणि १५ देशांसोबत काम करते आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कसं वापरता येणार WhatsApp Communities?

युजर या फिचरचा उपयोग करण्यासाठी अँड्रॉईड मोबाईलमध्ये चॅट च्या टॉपवर तर आयओएस मध्ये कम्युनिटीज हा टॅब आहे. त्यावर क्लिक करून कम्युनिटी च्या नव्या ग्रुपवर जाऊ शकतात. म्हणजेच ऑलरेडी असलेल्या ग्रुपमधून सब ग्रुप तयार करता येईल.

Community या फिचरमध्ये युजर्स अत्यंत सहजपणे ग्रुप स्विचही करू शकतात. अॅडमिन महत्त्वाची माहिती कम्युनिटीच्या मेंबर्सना पाठवू शकतो. कंपनीने दावा केला आहे की युजर्सने हाय लेव्हलने सिक्युरीटी प्रायव्हसी मिळणार आहे. या फिचरमध्ये युजरने वेगवेगळ्या ग्रुप तयार करायची गरज नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT