Niraj Gunde: देवेंद्र फडणवीस, नवाब मलिक नाव घेत असलेले नीरज गुंडे आहेत तरी कोण?
मुंबई: मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणाने आता वेगळं वळण घेतले असून समीर वानखेडेंवर आरोप करुन अडचणीत आणणाऱ्या नवाब मलिकांनी आता त्यांच्या मोर्चा भाजपकडे वळवला असून देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी फडणवीसांवर आरोप करताना नीरज गुंडे या व्यक्तीचे नाव घेतले असून ही व्यक्ती फडणवीसांची दूत होती आणि मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते कार्यालयापर्यंत सगळीकडे नीरज गुंडेचा मुक्त […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणाने आता वेगळं वळण घेतले असून समीर वानखेडेंवर आरोप करुन अडचणीत आणणाऱ्या नवाब मलिकांनी आता त्यांच्या मोर्चा भाजपकडे वळवला असून देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
नवाब मलिकांनी फडणवीसांवर आरोप करताना नीरज गुंडे या व्यक्तीचे नाव घेतले असून ही व्यक्ती फडणवीसांची दूत होती आणि मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते कार्यालयापर्यंत सगळीकडे नीरज गुंडेचा मुक्त वावर होता असा आरोप केला.
त्याशिवाय नीरज गुंडे यांची फडणवीसांच्या काळात सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महत्वाची भूमिका होती. सीबीआय, ईडीच्या कार्यालयात नीरज गुंडेची उठबस असायची असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
फडणवीस कायम नीरज गुंडेंच्या घरी जायचे आणि तिथे खलबतं व्हायची अशीही माहिती मलिकांनी दिली.