मार्क झुकरबर्ग Whatsapp विकणार?, यामुळे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाच्या कमाईत पहिल्यांदाच मोठी घट झाली आहे. 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत मेटाच्या महसुलात घट दिसून आली आहे. त्याचा प्रभाव कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप या अ‍ॅपवरही दिसत आहे. त्यामुळे मार्क झुकेरबर्ग व्हॉट्सअ‍ॅप विकणार असल्याची चर्चा आहे. अहवालानुसार मेटाच्या एकूण महसुलात 1 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. यामुळे त्यांची कमाई 28.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 23 हजार अब्ज रुपये) इतकी कमी झाली आहे.

तिसऱ्या तिमाहीतही त्यात घट होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. महिन्याच्या तिसऱ्या तिमाहीतही कंपनीला मोठा घाटा होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या अंदाजानुसार तिसर्‍या तिमाहीत त्यांची कमाई सुमारे 20 हजार अब्ज रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

मार्क झुकरबर्ग यांचा फोकस दुसऱ्या गोष्टीकडे

Facebook व्यतिरिक्त, Meta चा एकूण नफा देखील 36 टक्क्यांनी घसरून 6.7 अब्ज डॉलर झाला आहे. फेसबुककडे मेटाव्हर्स संदर्भात एक मोठी योजना आहे आणि कंपनीने त्यावर कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मार्क झुकरबर्ग मेटाव्हर्सच्या ड्रीम प्रोजेक्टवरती काम करत आहेत. या विभागात गेल्या तिमाहीत 2.8 अब्जांचा तोटा झाला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपवर सर्वात मोठी गुंतवणूक केली होती, परंतु कंपनीला त्याचा कोणताही फायदा मिळत नाहीये. झुकरबर्ग यांच्यासमोर अजूनही अनेक आव्हाने आहेत. Instagram ला TikTok सारखे बनून वापरकर्त्यांना त्यांना अधिक गुंतवून ठेवायचे आहे.

इन्टाग्राममधून मेटा कंपनीला फायदा पण…

किशोरवयीन मुले आता फेसबुकवर पूर्वीसारखे सक्रिय राहिलेले नाहीत. यामुळे कंपनीची वाढही मंदावली आहे. याशिवाय अ‍ॅपल फेसबुक अ‍ॅपद्वारे लोकांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातदारांनाही ब्लॉक करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. परंतु, इन्स्टाग्रामसारखे पैसे कमवून देऊ शकत नाही.

ADVERTISEMENT

झुकरबर्गने 2012 मध्ये इंस्टाग्राम 1 बिलियन डॉलरला विकत घेतले. त्यानंतर या अ‍ॅपने 2019 मध्येच कंपनीला 20 बिलियन डॉलरचा नफा मिळवून दिला. त्यानंतर त्याने 2014 मध्ये 19 अब्ज डॉलर्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप खरेदी केले. पण, कमाईच्या बाबतीत ते इन्स्टाग्रामच्या खूप मागे आहे.

ADVERTISEMENT

या कंपन्या व्हॉट्सअ‍ॅप खरेदी करण्यासाठी शर्यतीत

अहवालात असे सांगण्यात आले आहे की, त्यातून मिळणारा नफा खूपच कमी आहे, त्यामुळे Whatsapp चा IPO येण्याची शक्यता आहे. अशी चर्चा आहे की मेटा हे अ‍ॅप मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीला विकू शकते. मायक्रोसॉफ्टने प्रथम ते खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे.

याशिवाय, जर सॉफ्टबँकचा आर्म होल्डिंग्सचा IPO कंपनीसाठी चांगला असल्याचे सिद्ध झाले आणि Masayoshi Son ला आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज वरून आपले लक्ष हटवून मेसेजिंगवर लक्ष केंद्रित करायचे असेल तर ते देखील WhatsApp चे खरेदीदार होऊ शकतात. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही सूचना किंवा अधिकृत माहिती दिलेली नाही. पण तज्ज्ञांच्या मते, कंपनीला असाच तोटा होत राहिला तर व्हॉट्सअ‍ॅपची विक्री होऊ शकते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT