एसटी कर्मचारी संप मागे घेणार का? कर्मचाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ-पडळकर
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठी पगारवाढ केल्याचं अनिल परब यांनी जाहीर केलं. मात्र यानंतर मुख्य प्रश्न आहे तो एसटी कर्मचारी घेणार की नाही. सरकारतर्फे कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एसटी संप मागे घेण्याबाबत कर्मचाऱ्यांशी […]
ADVERTISEMENT

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठी पगारवाढ केल्याचं अनिल परब यांनी जाहीर केलं. मात्र यानंतर मुख्य प्रश्न आहे तो एसटी कर्मचारी घेणार की नाही. सरकारतर्फे कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एसटी संप मागे घेण्याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. तर सदाभाऊ खोत यांनी हीच भूमिका घेतली आहे.
कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या उद्या सकाळी कामावर हजर व्हा असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून करण्यात आलंय. तर संपावेळी केलेल्या कारवाईही मागे घेणार असल्याची घोषणा परब यांनी केलीय. निलंबन मागे घेणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. एसटी कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचं स्वागत होणार की संपावर ठाम राहणार हे अजूनही अस्पष्ट आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांशी बोलून संपाबाबत भूमिका घेऊ असं सूचक विधान केलंय. तर सदाभाऊ खोत यांनीही हीच भूमिका मांडली आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानातही दाखल झाले आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.