नाशिक : महिला सरपंचाने विष प्राशन करत संपवलं आयुष्य; तिघांना पोलिसांनी केलं अटक

महिलेच्या भावाने पोलिसांत दिली तक्रार : तिघांविरुद्ध लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक : महिला सरपंचाने विष प्राशन करत संपवलं आयुष्य; तिघांना पोलिसांनी केलं अटक
सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एका महिला सरपंचाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महिला सरपंचाने विष प्राशन करत आयुष्य संपवलं. दरम्यान, याप्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरकडच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटकही करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मरळगोई खुर्द गावात ही धक्कादायक घटना आहे. येथील महिला सरपंचाच्या आत्महत्येप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथील महिला सरपंच योगिता अनिल फापाळे यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येबद्दल शंका उपस्थित करत मयत महिला सरपंचाच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून, पतीसह सासरच्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

विषामुळे मृत्यू झालेल्या योगिता यांचे भाऊ संतोष शांताराम गवळी यांनी पोलीस तक्रारीत म्हंटले आहे की, 'बहीण योगिता सरपंच झाल्यानंतर पती, दीर आणि सासरे यांच्याकडून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देणे सुरू झाले.'

भाऊ संतोष यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधान 306, 323, 504, 506, 34 अनन्वये गुन्हा दाखल केला असून, पती अनिल, दिर प्रदीप आणि सासरे बाबासाहेब फापाळे यांना अटक केली आहे. महिला सरपंचाच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in