जागतिक वारसा दिन! चंद्रपुरातील १२व्या शतकातील लोह कारखान्याच्या पाऊलखुणा
–विकास राजूरकर, चंद्रपूर चद्रंपूरपासून मुल रोडवर १५ किमी अंतरावर घंटाचौकी नावाचं खेडं आणि प्राचीन शिव मंदिर आहे. ह्याच मंदिराजवळ तब्बल १ किमी परिसरात ८०० वर्षपूर्वीचा लोह अवजारे बनवण्याचा प्राचीन कारखाना आढळून आला आहे. भूशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांना येथे काही पुरातन अवशेष मिळाले आहेत. शिव मंदिर आणि इतर मंदिरं बांधण्यासाठी दगड फोडण्यासाठी […]
ADVERTISEMENT

–विकास राजूरकर, चंद्रपूर
चद्रंपूरपासून मुल रोडवर १५ किमी अंतरावर घंटाचौकी नावाचं खेडं आणि प्राचीन शिव मंदिर आहे. ह्याच मंदिराजवळ तब्बल १ किमी परिसरात ८०० वर्षपूर्वीचा लोह अवजारे बनवण्याचा प्राचीन कारखाना आढळून आला आहे. भूशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांना येथे काही पुरातन अवशेष मिळाले आहेत.
शिव मंदिर आणि इतर मंदिरं बांधण्यासाठी दगड फोडण्यासाठी लागणारी छन्नी आणि इतर अवजारे बनवण्यासाठी मातीचे साचे आणि गाळलेले लोखंड येथे मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. हा लोह कारखाना ११ किंवा १२व्या शतकातील परमार राज्यांच्या काळातील असावा असं मत पुरातत्व अभ्यासक सुरेश चोपने यांनी व्यक्त केलं आहे.