अकोला : दुबईवरुन आलेल्या तरुणीला कोरोनाची लागण, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशभरासह राज्यावर सध्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचं संकट घोंगावत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारसह राज्य सरकारने बाहेरील देशांतून आलेल्या नागरिकांसाठी नियम कडक केले आहेत. अकोल्यात दुबईवरुन आलेल्या एका तरुणीला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत.

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत २३० नागरिक हे बाहेरील देशातून आले आहेत. दरम्यान ज्या तरुणीचा RTPCR अहवाल पॉजिटीव्ह आला आहे तिचे नमुने हे पुण्यात ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांचं काम आता वाढलं आहे. या तरुणीच्या संपर्कात आलेल्या इतर चार ते पाच जणांवरही आरोग्य विभागाची करडी नजर असून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बाहेरील देशांमधून अकोल्यात आलेल्या रुग्णांचे पत्ते आणि संपर्क क्रमांक शोधून आरोग्य यंत्रणा त्यांची तपासणी करत आहेत. परंतू सध्याच्या घडीला ५० हून अधिक नागरिकांचा संपर्क होत नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT