धाराशीवमध्ये मविआ अन् भाजपचा करेक्ट कार्यक्रम; CM शिंदेंनी ठाण्यात बसून दिला धक्का

ADVERTISEMENT

Deepak Kesarkar told the reason why Chief Minister Eknath Shinde went on a 3-day vacation.
Deepak Kesarkar told the reason why Chief Minister Eknath Shinde went on a 3-day vacation.
social share
google news

धाराशीव (गणेश जाधव) :

जिल्ह्यातील कळंब तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (UBT) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 3 माजी नगराध्यक्ष, 6 माजी उप नगराध्यक्ष, 2 माजी नगरसेवक यांच्यासह जवळपास 25-30 पदाधिकाऱ्यांनी आज (सोमवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. पण या पक्षप्रवेशामुळे खरा धक्का बसल्याची चर्चा आहे ती भाजपला (BJP). यातून एक प्रकारे उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर राजकीय कुरघोडी केल्याची चर्चा आहे. (25-30 office bearers of NCP from Kalamba taluka joined Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde)

ठाण्यात बसून मुख्यमंत्र्यांच्या धाराशिवमध्ये भाजपला धक्का :

भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचा धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघ हा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. परंतु 2019 च्या लोकसभा पराभवानंतर राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर मतदारसंघातून रिंगणार उतरले. आज प्रवेश करणारे पदाधिकारी हे मुख्यतः राणा जगजीतसिंह पाटील हे राष्ट्रवादीमध्ये असताना राणा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. राणा जगजीत सिंह पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये राहणे पसंत केले होते. मात्र ही मंडळी राणा पाटील यांच्या सदैव संपर्कात होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : सावरकरांना दाढी मान्य नव्हती, डॉ.मिंधे गुळगुळीत फिरणार का? संजय राऊतांचा सवाल

विधानसभा 2019 मध्ये या लोकांनी राणा पाटील यांच्या सूचनेनुसार धाराशिव-कळंब मतदारसंघात अपक्ष उमेदवार अजित पिंगळे यांना मदत केली होती. त्यामुळे त्यांनी 20 हजाराचा मतांचा टप्पा सहजरित्या पार केला होता. याचा परिणाम होऊन राष्ट्रवादीचे उमेदवार संजय निंबाळकर पराभूत झाले तर तत्कालिन युतीचे उमेदवार कैलास पाटील विजयी झाले होते. त्यानंतरही ही मंडळी उघडपणे राणा जगजीतसिंह पाटलांसोबत भाजपमध्ये न जाता त्यांचे कट्टर समर्थक असल्याने ते त्यांच्याच मागे राहतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.

25-30 office bearers of NCP from Kalamba taluka joined Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde

ADVERTISEMENT

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरची दंगल फडणवीसांनी घडवून आणली? शरद पवार म्हणाले…

पण आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपा आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वावर शंका प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच मध्यंतरी राणाजगजीतसिंह पाटील यांनी निधी वाटपावरून डॉ. तानाजी सावंतांवर आरोप केले होते, तेव्हापासून पाटील आणि सावंत यांच्यामध्ये सुप्त राजकीय संघर्ष सुरू होता. प्रवेशापूर्वी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा विकास सावंतांशिवाय कोणीही करू शकत नाही या केलेल्या विधानावरून राणा पाटलांचे राजकीय खच्चीकरण सावंतांनी योग्य प्रकारे साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT