‘दुसरे पप्पू’ म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना आदित्य ठाकरे बालेकिल्ल्यात जाऊन भिडणार!
आदित्य ठाकरे रोज शिंदे गटातील ४० आमदारांवर बरसत आहेत. खोक्यांचे आरोप करत आहेत. राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याचं आव्हान देत आहेत. आदित्य ठाकरेंच्या याच आव्हानाला अब्दुल सत्तारांकडून जशास तसं उत्तर मिळत आहे.सत्तारांनी आमदारकीवर पाणी सोडण्याची तयारी दाखवली. एवढंच नाही, तर कधीकाळी नेता मानलेल्या आदित्य ठाकरेंची सत्तारांनी दुसरे पप्पूही म्हटलं. दोघांमधे जोरदार कलगीतुरा रंगलेला असतानाच […]
ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे रोज शिंदे गटातील ४० आमदारांवर बरसत आहेत. खोक्यांचे आरोप करत आहेत. राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याचं आव्हान देत आहेत. आदित्य ठाकरेंच्या याच आव्हानाला अब्दुल सत्तारांकडून जशास तसं उत्तर मिळत आहे.सत्तारांनी आमदारकीवर पाणी सोडण्याची तयारी दाखवली. एवढंच नाही, तर कधीकाळी नेता मानलेल्या आदित्य ठाकरेंची सत्तारांनी दुसरे पप्पूही म्हटलं. दोघांमधे जोरदार कलगीतुरा रंगलेला असतानाच आता ठाकरे थेट सत्तारांच्या बालेकिल्यात शिरण्याच्या तयारीत आहेत.
आदित्य ठाकरे सध्या सत्तारांशी पंगा घेण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. ठाकरेंनी सत्तारांशी पंगा का घेतला, यातून का साधलं जाणार आहे, आणि सिल्लोडमध्ये बाहुबली टाईप प्रतिमा असलेले सत्तार अडचणीत येऊ शकतात का? असं प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालेत.
आदित्य ठाकरे विरद्ध अब्दुल सत्तारांमध्ये वादाची ठिणगी कशी पडली?
चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं. पहिल्यांदाच ठाकरेंच्या गादीला आणि मातोश्रीला थेट आव्हान मिळालं. त्यामुळे पहिल्यांदाच ठाकरेंना बंडानंतर थेट रस्त्यावरून उतरून चार हात करावे लागत आहेत. मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी राज्यभरात नव्यानं संघटनात्मक जुळवाजुळव सुरू केलीये. तर आदित्य ठाकरेंनी बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून दौरे सुरू केलेत.
मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, तर आठवडाभरात माझी बातमी दिसेल, ठाकरेंना सत्तारांचं चॅलेंज