‘आदित्य ठाकरे छोटा पप्पू’; अब्दुल सत्तारांच्या विधानावर शिंदे-ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय?
टाटा एअरबस प्रोजेक्टवरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपलीये. आदित्य ठाकरेंनी हा प्रोजेक्ट जाण्याला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला. सत्तारांच्या या विधानावर शिंदे आणि ठाकरे गटाच्या प्रतिक्रिया समोर आल्यात. वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट पाठोपाठ टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्यानं राज्यातील शिंदे-फडणवीस […]
ADVERTISEMENT

टाटा एअरबस प्रोजेक्टवरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपलीये. आदित्य ठाकरेंनी हा प्रोजेक्ट जाण्याला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला. सत्तारांच्या या विधानावर शिंदे आणि ठाकरे गटाच्या प्रतिक्रिया समोर आल्यात.
वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट पाठोपाठ टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्यानं राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांच्या टीकेचं धनी ठरलंय. त्यावरूनच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारमुळे टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचा आरोप केला. ठाकरेंनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले, ‘आदित्य ठाकरेंनी टाटांचा प्रकल्प बाहेर कसा गेला? तारीख कोणती होती? हे पाहिलं तर २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळी त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. जे बोलताहेत ते कॅबिनेट मंत्री होते. मग प्रकल्पात देवाण घेवाण झाली नाही म्हणून प्रकल्प राज्याबाहेर गेला?”, अशी शंका उपस्थित करत सत्तारांनी ठाकरे सरकारवरच गंभीर आरोप केला.
पुढे सत्तार असंही म्हणाले, “छोटा पप्पू पहिले बोलले असते, तर आज ही वेळ आली नसती. २०२१ मध्ये प्रकल्प गुजरातला गेला. हे सर्व पाप २०२१ मधलं आहे. एकनाथ शिंदे २०२२ मध्ये मुख्यमंत्री झाले. संभ्रमाचं वातावरण बनवायचं असं राजकारण केलं तर दुसरे पप्पू म्हणून यांची जागा कुठे असेल, हे सर्वांना माहितीये”, असं सत्तार म्हणाले होते.