Corrupt Manus एकनाथ शिंदे : आदित्य ठाकरेंनी सांगितला CM शब्दाचा नवीन अर्थ

मुंबई तक

Aditya Thackeray News : मुंबई : आताचं सरकार सर्वसामान्यांचं नाही, तर कॉन्ट्रॅक्टरच सरकार आहे हे आधीपासून सांगतं आहे. मुंबईकरांचा प्रत्येक पावलावर पैसा वाचवतं ९० हजार कोटींच्या ठेवी बनविल्या. पण आता मुंबईकरांचा हा पैसा लुटायची सुरुवात झाली आहे. रस्त्यांच्या कामात मोठा घोटाळा झाला. मात्र काम रेटून नेत आहेत. पण हा मुंबईकरांचा पैसा आहे, असं म्हणतं सीएम […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Aditya Thackeray News :

मुंबई : आताचं सरकार सर्वसामान्यांचं नाही, तर कॉन्ट्रॅक्टरच सरकार आहे हे आधीपासून सांगतं आहे. मुंबईकरांचा प्रत्येक पावलावर पैसा वाचवतं ९० हजार कोटींच्या ठेवी बनविल्या. पण आता मुंबईकरांचा हा पैसा लुटायची सुरुवात झाली आहे. रस्त्यांच्या कामात मोठा घोटाळा झाला. मात्र काम रेटून नेत आहेत. पण हा मुंबईकरांचा पैसा आहे, असं म्हणतं सीएम म्हणजे करप्ट माणूस असा नवा अर्थ सांगतं शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला. ते मुंबईतील गोरेगावमध्ये शिवगर्जना अभियान यात्रेत बोलत होते. (Aditya thackeray target shivsena and bjp leader in Goregaon public rally)

महाराष्ट्राच मुख्यमंत्री कार्यालयही दिल्लीतून चालवितात :

देसाई साहेब, मगाशी तुम्ही म्हणालात, महाराष्ट्रातून अनेक गोष्टी गुजरात, दिल्ली किंवा इतर राज्यात हलविल्या. यात आरबीआय, एअर इंडियाच ऑफिस, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर असेल. यात सगळ्यात एक गोष्ट मात्र राहिली. ती म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय. महाराष्ट्राच मुख्यमंत्री कार्यालयही हल्ली दिल्लीतून चालविलं जातं आहे. हीच वेदना आणि हेच दुःख आहे.

EC म्हणजे Entirely Compromised : आदित्य ठाकरे

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. ते म्हणाले, मी शिवसेनाच म्हणणार, मी दुसरी शिवसेना मानतं नाही. हल्ली EC म्हणजे Election Commission राहिलं नसून ते आता Entirely Compromised झालं आहे. त्यामुळे कोणताही निर्णय दिला असला तरी तो लोकशाहीला घातक आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp