गुजरातमधून भाजपचं सरकार जाणार! अरविंद केजरीवालांनी पत्रकार परिषदेत दाखवला कागद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गांधीनगर : गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. गुजरातमधून यंदा भाजप सत्तेबाहेर जात असून आम आदमी पक्षा सत्तेत येणार आहे, अशी लिखीत भविष्यवाणी अरविंद केजरीवाल यांनी केली. एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

अरविंद केजरीवाल म्हणाले, 27 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आम आदमी पक्षाच्या बाजूने असलेल्या या वातावरणामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. रस्त्यावर कुणालाही विचारा, तो मतदार भाजप किंवा आपला मत देणार असल्याचं सांगतो. पण भाजपला मत देणाऱ्यांशी ५ मिनिट संवाद साधल्यानंतर तो सांगतो, मी आणि माझा संपूर्ण मोहल्ला आपलाच मत देणार आहे, पण जाहीरपणे नाव घ्यायला आम्हाला भीती वाटते. हेच कारण आहे की भाजपमध्ये अगदी वाईट पद्धतीने अस्वस्थता पसरली आहे.

गुजरात पहिलं असं राज्य आहे, जिथं सामान्य माणूस मतदानाबाबत बोलायला घाबरतो. त्याला भाजपचे लोक मारतील असं वाटतं, असाही दावा केजरीवाल यांनी केला. ते पुढे म्हणाले, काँग्रेसचा मतदार शोधूनही सापडत नाही. यावेळी भाजपचं मोठ्या प्रमाणावरील मतदान ‘आप’ला होणार आहे. माझा राजकीय अंदाज खरा आतापर्यंत खरा ठरला आहे. त्यामुळे मी पुन्हा लिहून देतो की गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जुनी योजना लागू करण्याचे आश्वासन :

यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल जुनी योजना लागू करण्याचे आश्वासन गुजरातच्या जनतेला दिलं. मी गुजरातमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की, आमचं सरकार स्थापन झाल्यास 31 जानेवारीपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल. मी हे हवेत बोलत नाही, आम्ही पंजाबमध्ये ओपीएस लागू केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT