एकनाथ शिंदेंनी खुलासा केल्यानंतर अशोक चव्हाणांकडून प्रश्नांची सरबत्ती, प्रकरण वाढणार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात ठिणगीप्रमाणे पडलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटचा मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चर्चेत आला. कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी प्रश्नांची सरबत्ती केलीये. त्यामुळे वाद आणखी चिघळणाची चिन्ह दिसत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात ठिणगीप्रमाणे पडलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटचा मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चर्चेत आला. कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी प्रश्नांची सरबत्ती केलीये. त्यामुळे वाद आणखी चिघळणाची चिन्ह दिसत आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा चर्चेत आला. परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिल्यानंतर कर्नाटक सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. इतकंच नाही, तर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या त्या ट्विटवर भाष्य केलं.
‘आम्ही त्या मुख्यमंत्र्यांना समोरासमोर सांगितलं की, तुम्ही ट्विट करताहेत, ते ट्विट चुकीचं आहे. त्यांनी सांगितलं की, ते ट्विट आमचं नाहीये. त्याचीही माहिती त्यांना मिळाली आहे. त्याची माहिती सभागृहात मिळेल. त्या ट्विटमागे कुठला पक्ष आहे, याचीही माहिती मिळेल’, असं सांगत एकनाथ शिंदे विरोधकांवर हल्ला चढवला.
‘आमच्याकडे पोलिसांकडून माहिती आलीये’, एकनाथ शिंदे भडकले, विरोधकांना सुनावलं










