मुख्यमं6ी शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोमणा
मुख्यमं6ी शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोमणाफाइल फोटो

CM Shinde: 'बाळासाहेबांनी कधी CM पदासाठी तडजोड केली नाही', कोणाला टोमणा?

CM Shinde Taunt Uddhav Thackeray: बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एक टोमणा लगावला.

Eknath Shinde taunted Shiv Sena chief Uddhav Thackeray मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तैलचित्राचं अनावरण आज (23 जानेवारी) विधानसभेतील (Vidhan Sabha) सेंट्रल हॉलमध्ये करण्यात आलं. यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते हे उपस्थित होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) भाषण करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जोरदार टोमणा लगावला. (balasaheb never compromised for the post of cm eknath shinde taunts uddhav thackeray)

'बाळासाहेबांनी कधी मतांवर डोळा देऊन त्यांनी राजकारण केलं नाही. बाळासाहेबांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. मुख्यमंत्री पदासाठी कधी त्यांनी तडजोड केली नाही, आपल्या विचारांसाठी कधी तडजोड केली नाही. हे देखील आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहे. ही शिकवण त्यांचीच आहे.' असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं.

मुख्यमं6ी शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोमणा
BJPचा निरोप बाळासाहेबांनी का धुडकावलेला?, राज ठाकरेंनी सांगितला भन्नाट किस्सा

पाहा मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात काय म्हणाले:

'सगळ्यांनी भाषणात चौकार षटकार मारलेत त्यामुळे माझी पंचाईत झाली आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा क्षण अनमोल आहे. त्याचं मोल करता येणार नाही. शिवसेना प्रमुखांमुळे माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक विधानसभा, विधानपरिषदेपर्यंत पोहचू शकले.'

'हा माझ्यासाठी महत्त्वाचा क्षण आहे. मी बाळासाहेबांना पुन्हा एकदा वंदन करतो. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही. बाळासाहेबांनी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. एकेकाळी महाराष्ट्रात ठराविक घराण्यांची सत्ता होती. पण बाळासाहेबांनी सामान्य घरातल्या मुलांना संधी दिली. बहुसंख्य शिवसेनेच्या नेत्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही. हे केवळ बाळासाहेबांनी केलं.'

'नाहीतर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री कसा झाला असता? त्यांच्या विषयी बोलताना कंठ दाटून येतो. कारण त्यांच्यामुळे इथपर्यंत प्रवास झाला आहे. बाळासाहेबांनी कधी शब्द फिरवला नाही. आम्ही कमिटमेंट त्यांच्याकडून शिकलो.'

मुख्यमं6ी शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोमणा
Rane: 'बाळासाहेबांना मानसिक त्रास..', 'त्या' कार्यक्रमातही राणे ठाकरेंवर बरसले

'बाळासाहेब ठाण्यात यायचे तेव्हा म्हणायचे मला ठाण्याची काळजी नाही इकडे एकनाथ शिंदे आहेत. गेली 25 वर्षं ठाण्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आहे. तुमच्यात धाडस आणि आत्मविश्वास असेल तर कोणी तुम्हाला रोखू शकत नाही. हे बाळासाहेबांनीच आम्हाला शिकवलं आहे. तुम्ही हे पाहतच आहात.'

'अजितदादा म्हणाले ते खरंय, एकदा मुस्लीम बांधव मातोश्रीवर आले होते. त्यांचा नमाज पढण्याची वेळ दिली. बाळासाहेबांनी त्यांना जागा दिली. पण पाकिस्तानचे गोडवे जे गात होते त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही. काही गोष्टी मी मुख्यमंत्री असल्याने बोलू शकत नाही.'

'मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी कधी विचारांशी तडजोड केलेली नाही. स्वत:ला काही पाहिजे म्हणून त्यांनी रिमोट कंट्रोल चालवला नाही याचे आम्ही साक्षीदार आहोत.'

'बाळासाहेबांनी कधी जात-पात धर्म पाहिला नाही. कोणाकडे किती मतं आहेत हे काही बाळासाहेबांनी पाहिलं नाही. जो काम करेल त्याला पुढे आणण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. त्याचं काम बघून संधी दिली. ते प्रखर हिंदुत्ववादी होतेच. त्यांच्या हिंदुत्वामध्ये ओतप्रोत राष्ट्रभक्ती भरली होती. त्यांनी कधी मतांवर डोळा देऊन त्यांनी राजकारण केलं नाही.'

'बाळासाहेबांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. मुख्यमंत्री पदासाठी कधी त्यांनी तडजोड केली नाही, आपल्या विचारांसाठी कधी तडजोड केली नाही. हे देखील आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहे. ही शिकवण त्यांचीच आहे.' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनाच जोरदार टोमणा मारला. त्यामुळे आता यावर ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर मिळतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in